कल्याण: कल्याण (Kalyan News) तालुक्यात पूरग्रस्तांच्या निधी वाटपात घोटाळा (Kalyan Scam News) झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या प्रकरणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कल्याण प्रांत अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी तलाठी प्रशांत चौगुले (Prashant Chougule) यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या निधी वाटपात 60 ते 70 लाखांचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (kalyan Flood Fund Scam)
[read_also content=”पांघरूणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापला अन् जेलमध्येच गळ्याला लावला फास, आरोपीच्या आत्महत्येमुळे पुणे पोलिसांसमोर नवा पेच https://www.navarashtra.com/maharashtra/accused-of-theft-crime-attempted-suicide-in-vishrambagwada-pune-jail-nrsr-400587.html”]
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. 2019 साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसलं होतं. या पूरग्रस्तांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. पंचनाम्यानुसार पूरात बाधीत झालेल्यांना सरकारकडून निधी मिळावा असा प्रस्ताव कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून राज्य सरकारला यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता.
बनावट भाडेकरारनामे तयार करून लाटला निधी
दरम्यान, 2019 साली आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीत आणि चक्रीवादळात बाधित झालेल्यांना बाधितांना तहसील कार्यालयाकडून 42 कोटी 53 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलं होतं. मात्र या अनुदान वाटपात घाेटाळा झाल्याची तक्रार डोंगरे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे बनावट भाडेकरारनामे तयार करुन त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. ज्या नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. अशा नागरिकांच्या बँका अन्य जिल्ह्यात आणि राज्यात हाेत्या. ते नागरिक मांडा टिटवाळा तलाठी यांच्या कार्यक्षेत्रात राहत असल्याचे भासवून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मदत निधीचा गैरव्यवहार करुन आर्थिक घाेटाळा केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य क्रायकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी कल्याणचे प्रांत अधिकाऱ्यांना चाैकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी चाैकशी केली जाईल. या घोटाळ्याचा चाैकशीचा अहवाल मुख्य अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे.