फुले आणण्यासाठी निघालेल्या फुलविक्रेत्या महिला प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने तीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल होताच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात महिलेला लुटणारा रिक्षा चालक अनिल खिल्लारे यांना बेड्या ठोकल्या त्याचबरोबर अनिल सोबत त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये एक अल्पवयीन मुलीच्या देखील समावेश आहे. त्यांच्या रिक्षावर खिल्लारे लिहिले होते पोलिसांनी रिक्षा सोडली आणि टोळीचा पडदाफाश केला.
डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणारी तक्रादार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते. ही महिला डोंबिवली घारडा सर्कल येथून कल्याण एपीएमसी मार्केटच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. महिला घारडा सर्कल येथे एका रिक्षात बसली. या रिक्षात रिक्षा चालकासह आणखी तिघेजण बसले होते या रिक्षाचालकाने न्यू गोविंदवाडी बीएसयूपी इमारती जवळ निर्जनस्थळी रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याचवेळी मागे बसलेल्या दोन अल्पवयीन मुलानी फिर्यादी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. या प्रकरणी महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात सदर गुन्हा उघडकीस आणण्यात डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला यश आले. महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर त्याचे तीन अल्पावयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.