पुणे : खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली, चौकशी केली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काकडे उपस्थित होते. दरम्यान, आज शरद पवारांनी गिरीश बापट यांच्या तब्यतेची विचारपूस करताना, आपण लवकर बरे व्हा, असं म्हटलं तसेच अधिवेशन होताच आपणास अनेक सदस्य भेटण्यास येणार आहेत. या दोन नेत्यामध्ये जवळपास अर्धा तास संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
[read_also content=”मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने https://www.navarashtra.com/maharashtra/mahavikas-aghadi-mla-aggressively-for-abdul-sattar-resignation-sit-in-vail-and-protest-356901.html”]
मागील काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांना भेटण्यासाठी तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेते येऊन गेले आहेत. विधानपरिषद सभापती निलम गोर्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बापट यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर आज आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.