JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
रिलाअंस जिओच्या महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3999 रुपये आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना वर्षभर रिचार्ज करण्याची कटकट नको. याशिवाय ज्या यूजर्सना जास्त डेटा आणि एक्स्ट्रा डिजिटल बेनिफिट्स पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2.5GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जातो. यामुळे ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते, असे यूजर्स या प्लॅनची खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये देशभरात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध असणार आहे. जर तुमचा फोन 5G सपोर्टेड असेल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G इंटरनेटचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना वर्षभर एकूण 912.5GB हाई-स्पीड डेटा मिळतो. ज्यामुळे हा प्लॅन दिर्घकाळ वापरासाठी योग्य निवड ठरणार आहे.
एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर
एवढंच नाही तर जिओच्या या प्लॅनमध्ये अतिरिक्त डिजिटल बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. यामध्ये नवीन कनेक्शनवर दोन महिन्याचे फ्री जियो होम ट्रायल समाविष्ट आहे. याशिवाय तीन महिन्यांसाठी जियो हॉटस्टारचे मोबाइल आणि टीवी एक्सेस, 50GB चा क्लाउड स्टोरेज आणि FanCode चे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. या प्लॅनसह 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यूजर्सना गुगल जेमिनी प्रोचा एक्सेस देखील दिला जात आहे, ज्याची किंमत बाजारात हजारो रुपये असल्याचे म्हटले जाते.






