Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Wari 2026: ‘ज्ञानबा-तुकाराम’चा जयघोष आता सातासमुद्रापार; लंडनहून ‘ग्लोबल वारी’ पंढरपूरकडे रवाना!

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वारकरी परंपरेचा महिमा आता जागतिक स्तरावर पोहोचला असून लंडनहून सुरू झालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती, विठ्ठल भक्ती आणि संत विचार जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक ठरत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 01:03 PM
'ज्ञानबा-तुकाराम'चा जयघोष आता सातासमुद्रापार; लंडनहून 'ग्लोबल वारी' पंढरपूरकडे रवाना!

'ज्ञानबा-तुकाराम'चा जयघोष आता सातासमुद्रापार; लंडनहून 'ग्लोबल वारी' पंढरपूरकडे रवाना!

Follow Us
Follow Us:
  • सातासमुद्रापार दुमदुमली विठ्ठल भक्ती
  • इंग्लंडहून निघाली ‘ग्लोबल वारी’
  • ११ देश आणि ५० दिवसांचा ऐतिहासिक प्रवास
पोपट पिटेकर,अहिल्यानगर : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी रुजविलेल्या वारकरी संप्रदायाचा महिमा आता सातासमुद्रापार पोहोचला असून, ‘ज्ञानबा-तुकाराम’चा जयघोष इंग्लंडच्या भूमीवर दुमदुमला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि विठ्ठल भक्तीचे प्रतीक असलेली आषाढी वारी यंदा जागतिक स्वरूपात साकारली आहे. लंडनहून सुरू झालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून, वारकरी परंपरा, संत विचार आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरत आहे.

‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…’, पंढरीच्या वारीची तयारी सुरू; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

लंडनमधील रॉयल विंडसर रेसकोर्स परिसरातून या वारीला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करून वारीचे विधिवत प्रस्थान करण्यात आले. या सोहळ्यासाठी युनायटेड किंगडमसह युरोपातील विविध देशांतील वारकरी, विठ्ठलभक्त, अनिवासी भारतीय आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गतवर्षी डॉ. खेडकर यांनी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन २२ देशांमधून तब्बल १८ हजार किलोमीटरचा कारने प्रवास केला होता. ७० दिवस चाललेल्या या यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच या ‘ग्लोबल वारी’ची संकल्पना साकार झाली.

यंदा पहिल्यांदाच लंडनहून ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ सुरू करण्यात आली असून ती सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ धार्मिक यात्रा नसून वारकरी परंपरा, संत विचार, विठ्ठल भक्ती आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पोहोचवणे हा आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसह विविध देशांतील भारतीय समुदायाने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

वारीदरम्यान सहभागी वारकरी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन आणि नामस्मरण करत विठ्ठल भक्तीचा जागतिक संदेश देत आहेत. “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने इंग्लंडमधील वातावरण भक्तिमय झाले असून, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

वारकरी संप्रदायाची परंपरा ही केवळ धार्मिक नसून समता, बंधुता, साधेपणा आणि मानवतेचा संदेश देणारी जीवनशैली मानली जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांनी प्रेरित ही वारी शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू राहिली आहे. आता त्याच वारीचे जागतिक स्वरूप साकार होत असल्याने हा उपक्रम वारकरी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान,पंढरपुर येथे होणाऱ्या आषाढी वारीसोबत या ग्लोबल वारीचा भावनिक आणि सांस्कृतिक संबंध जोडला गेला असून, विठ्ठल भक्तीचा संदेश आता जगभर पोहोचत असल्याची भावना वारकरी समुदायातून व्यक्त होत आहे.

“… यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

Web Title: Global wari london pandharpur warkari tradition vitthal devotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • maharashtra
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
3

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.