'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला...',पंढरीच्या वारीची तयारी सुरू; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर (फोटो सौजन्य-ChatGPT) 'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला...',पंढरीच्या वारीची तयारी सुरू; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर (फोटो सौजन्य-ChatGPT)
दरवर्षीप्रमाणे यंदाही देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात विठ्ठल दर्शनासाठी पायी प्रवास करतात. या सोहळ्यात राज्यभरातून हजारो दिंड्या सहभागी होतात. पालखी मार्गावरील प्रमुख मुक्काम, दर्शन व्यवस्था, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक बदल आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.
“… यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
यंदा पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकामुळे वारकऱ्यांना प्रवासाचे अचूक नियोजन करणे सोपे होणार आहे. विशेषतः बाहेरगावाहून येणारे भाविक, दिंडी प्रमुख आणि स्वयंसेवी संस्थांसाठी ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे. पालखी कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी मुक्काम करणार, प्रस्थानाची वेळ काय असेल आणि पंढरपुरात आगमन कधी होणार, याबाबतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांमुळे राज्यात भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जातो. पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या या प्रवासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Amravati News : श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त गर्दी
पालखी सोहळ्याचा मुख्य मार्ग आणि मुक्काम
७ जुलै: प्रस्थान सोहळा (देहू)
८ जुलै: इनामदार साहेब वाडा
९ जुलै: आकुर्डी (श्री विठ्ठल मंदिर)
१० ते ११ जुलै: निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ (पुणे)
१२ जुलै: लोणी काळभोर (कदम वाक वस्ती)
१३ जुलै: यवत (भैरवनाथ मंदिर)
१४ जुलै: वरवंड
१५ जुलै: उंडवडी गवळ्याची
१६ जुलै: बारामती (शारदा विद्यालय)
१७ जुलै: सणसर
१८ जुलै: निमगाव केतकी
१९ जुलै: इंदापूर
२० जुलै: सराटी
२१ जुलै: अकलूज
२२ जुलै: बोरगाव श्रीपूर
२३ जुलै: पिराची कुरोली
२४ जुलै: वाखरी
२५ ते २८ जुलै: पंढरपूर मुक्काम (आषाढी एकादशी सोहळा)
वारीतील विशेष आकर्षण
यंदाच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे सनियंत्रण ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे हे प्रमुख म्हणून करणार आहेत. तसेच, पालखी रथासाठी आणि चौघडा गाडीसाठी संस्थानाकडून तीन विशेष नवीन बैलजोड्यांची खरेदी यंदा करण्यात आली आहे.






