Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य

पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्हा परिषदेला ४४५ शिक्षक मिळाले असून, यामुळे ग्रामीण भागातील रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 30, 2026 | 02:05 PM
Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य
Follow Us
Follow Us:
  • पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गोंदिया जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात ४४५ नवीन शिक्षक मिळाले आहेत.
  • कागदपत्रांची पडताळणी व समुपदेशनानंतर हे सर्व नवीन शिक्षक पुढील १० ते १५ दिवसांत शाळांमध्ये रुजू होणार.
  • उर्वरित १८५ रिक्त पदांची भरती दुसऱ्या टप्प्यात होणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार.

ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला ४४५ शिक्षक उपलब्ध झाले आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व समुपदेशन करून रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. हे शिक्षक पुढील १० ते १५ दिवसात संबंधित शाळांमध्ये रुजू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे १८५ वर येणार आहे. उर्वरित पदे दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पवन खंडारे यांनी दिली.

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आली होती. त्यानुसार प्राथमिक विभागातील बंगाली माध्यमाची ५, हिंदी माध्यमाची ९५, मराठी माध्यमाची ४७८ आणि माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाची ५०, अशी एकूण ६२८ रिक्त पदे होती. यापैकी प्राथमिक विभागातील बंगाली माध्यमाची ३, हिंदी माध्यमाची ६७, मराठी माध्यमाची ३३० आणि माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाची ४५, अशी एकूण ४४५ पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात आली.

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप

येत्या दोन दिवसांत प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. प्रथम शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर समुपदेशनाद्वारे शाळांची नियुक्ती दिली जाईल. उपलब्ध शिक्षकांना तातडीने रुजू करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. उर्वरित १८५ रिक्त पदे दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची शक्यता आहे.

Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल

येत्या दोन दिवसात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, त्यानंतर समुपदेशनाद्वारे संबंधित शिक्षकांना शाळांची नियुक्ती देण्यात येईल. पुढील १० ते १५ दिवसात सर्व शिक्षक संबंधित शाळांमध्ये रुजू होतील. असे लायकराम भेंडारकर, अध्यक्ष, जि.प. गोंदिया यांनी सांगितले.

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. उपलब्ध झालेले ४४५ शिक्षक तातडीने शाळांमध्ये रुजू झाल्यास त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. असे मत पवन खंडारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया जिप यांनी व्यक्त केले.

Web Title: Gondia zilla parishad receives new teachers through pavitra portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Schools

संबंधित बातम्या

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन
1

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध
2

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !
3

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली
4

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.