लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार
Ladki Bahin Yojna news: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता देण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे हफ्ता देण्यास सुरूवात झाली असताना आता दुसरीकडे 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरु झाली आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या योजनेतून आता अपात्र महिलांना लाभ देणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्रशासनाने अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर सरकारी योजनांचाही लाभ घेत आहेत, असे आढळून आले होते. तसेच, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक पुरूषही या योजनेचे पैसे लाटत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर राज्य सरकारने अशा सर्व प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. तसेच एका घरात दोनपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या महिलांची संख्या जवळपास २६ लाख इतकी आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने ही यादी तयार केली आहे. सर्व महिलंची विभागानुसार चौकसी करण्यात येणार आहे.
एकीकडे अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू असतानाच, लाडक्या बहिणी योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली असून, रक्षाबंधनापूर्वीच सरकारने लाभार्थ्यांना ‘ओवाळणी’ दिली आहे.
सध्या या योजनेचा लाभ २ कोटी २९ लाख महिलांना मिळत आहे. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर लाखो अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या योजनेत घुसखोरी करून सरकारी निधीचा गैरफायदा घेणाऱ्या १४ हजारांहून अधिक पुरुषांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळालेला पैसा वसूल केला जाणार आहे. सरकारच्या अपेक्षेनुसार, येत्या वर्षभरात ही छाननी पूर्ण होऊन प्रत्यक्षात गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारची महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता उघड झाली असून, ठरवलेल्या निकषांचे उल्लंघन करून अनेक अपात्रांनी मदत घेतल्याचे समोर आले आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दर महिन्याला २,००० रुपयांची थेट आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. सुरूवातीला ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला आणि सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्याचे स्पष्ट निकष ठरवण्यात आले होते. मात्र, तपासणीत या निकषांचा भंग झाल्याचे आढळले.
विशेष म्हणजे, केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ तब्बल १४,००० पुरुषांनी घेतल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, सरकारकडून गैरव्यवहाराची चौकशी आणि कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.दरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अपात्र महिलांचा लाभ बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.