Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार

महाराष्ट्राचा उल्लेख नेहमी देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य असा केला जातो. परंतु महाराष्ट्राची ओळख इतकी मर्यादित नसून महाराष्ट्र ही त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या संतांची पवित्र भूमी; शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यांची जन्मभूमी तसेच अनेक समाज सुधारकांची कर्मभूमी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.    

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2022 | 04:19 PM
राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राचा उल्लेख नेहमी देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य असा केला जातो. परंतु महाराष्ट्राची ओळख इतकी मर्यादित नसून महाराष्ट्र ही त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या संतांची पवित्र भूमी; शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यांची जन्मभूमी तसेच अनेक समाज सुधारकांची कर्मभूमी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. १५) राजभवन येथे राज्यातील या वर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्तींचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुला – मुलींचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विज्ञान, आरोग्यसेवा, कला, क्रीडा, शौर्य या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आज देश झपाट्याने प्रगती करीत असून कर्तृत्ववान व्यक्तींमुळे राज्याची घोडदौड कायम राहील असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र ही प्रतिभावंत लोकांची खाण असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे राज्याच्या विकासात योगदान फार मोठे होते. त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते असे नमूद करून राज्याला त्यांच्यासारख्या दृष्ट्या लोकांची अधिक आवश्यकता आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ हिम्मतराव बावस्कर, डॉ विजयकुमार डोंगरे, डॉ अनिल राजवंशी व डॉ भीमसेन सिंघल यांचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते कु. शिवांगी काळे, जुई केसकर व स्वयम  विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण अनुपस्थित असल्यामुळे त्यांचा सत्कार त्यांच्या नातवाने स्वीकारला. तर डॉ बालाजी तांबे (मरणोपरांत) यांचा पुरस्कार श्रीमती वीणा तांबे यांनी स्वीकारला.

[read_also content=”राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा मार्ग अहिंसेचा व विकासाचा : महेश तपासे https://www.navarashtra.com/maharashtra/nationalist-congress-partys-path-of-non-violence-and-development-mahesh-tapase-nrdm-280366.html”]

यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक, आमदार इंद्रनील नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले व दीपक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Governor felicitates padma award winners at raj bhavan nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2022 | 04:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • bhagat sing koshyari
  • cmomaharashtra
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने
1

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
2

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
3

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
4

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.