Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

Graduate Election : आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते शरद लाड यांची भेट घेतली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) हेही उत्सुक आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 07:46 PM
Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

Follow Us
Follow Us:
  • ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्जॉ
  • निवडणूकीसाठी राष्ट्रवादीही आग्रही
  • लाड यांचा शब्द दिल्याचा दावा
सांगली : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Graduate Election) पार्श्वभूमीवर भाजप नेते व क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवारीबाबतच्या राजकीय चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद लाड यांच्या नावाची भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. लाड यांनी यापूर्वीही आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगली, मिरज परिसरातील लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत मतदार नोंदणी व निवडणूक नियोजनाबाबत चर्चा केली होती.

निवडणूकीसाठी राष्ट्रवादीही आग्रही

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघावर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडूनही दावा करण्यात येत असून प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेच्या उमेदवारीकडे महायुतीतील सर्व घटकांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे फडणवीस-लाड भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

लाड यांचा शब्द दिल्याचा दावा

शरद लाड यांनी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीबाबत शब्द दिल्याचा दावा केला होता. मात्र, भाजपकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही, त्यामुळे शुक्रवारी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून ७ ऑक्टोबरला छाननी, ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत आहे. मतदान २३ ऑक्टोबरला होणार आहे.

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Web Title: Graduate election cm devendra fadnavis meat bjp leader sharad lad rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • graduate

संबंधित बातम्या

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले
1

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले

बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर; SP संदीपसिंह गिल यांची घेतली भेट
2

बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर; SP संदीपसिंह गिल यांची घेतली भेट

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
3

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
4

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.