अकोला : जिल्ह्यात गुटख्याची आवक वाढल्याने तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. गुटखा माफियांवर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची वक्रदृष्टी पडली आहे. गेल्या वर्षभरात पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी एक कोटी १८ लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच विविध गुन्ह्यात १२४२ आरोपींना अटक केली आहे.
[read_also content=”११ वर्षीय मुलीला घातली लग्नाची मागणी, आरोपीविरुद्ध तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/11-year-old-girl-demanded-marriage-case-filed-against-accused-at-talegaon-police-station-nraa-263592.html”]
दारूची अवैध विक्री, निर्मिती करणा-या आरोपीविरुद्ध १९० गुन्हे दाखल केले असून २०४ आरोपींना अटक केली. या आरोपींकडून ३३ लाख ५६ हजार १३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगा-यांविरुद्ध १९९ गुन्हे दाखल करून ८३२ जुगा-यांना अटक केली. त्यांच्याकडून ८० लाख ३२ हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एन.डी.पी.एसचे ३१ गुन्हे दाखल केले असून ३४ आरोपींना अटक केली. २९ लाख ५२ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे ४७ गुन्हे दाखल केले असून ५३ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १८ लाख १२ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गौणखनिज अवैध उत्खनन व वाहतूक करणा-या २९ आरोपींना अटक करुन १९ गुन्हे दाखल केले आहेत. एक कोटी ४१ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
[read_also content=”मध्यप्रदेशातून अकोल्यात येतात देशी कट्टे, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे १०० खबरी सक्रिय https://www.navarashtra.com/maharashtra/from-madhya-pradesh-come-to-akola-with-desi-cuts-100-reports-of-special-team-of-superintendent-of-police-are-active-nraa-263562.html”]
आर्म अॅक्टचे ३४ गुन्हे दाखल करून ३४ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १९ तडीपार आरोपींच्या प्रकरणात गुन्हे दाखल केले असून १९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १२५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ईसी अॅक्ट अन्वये १६ गुन्हे दाखल करुन २१ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ८५ लाख ९८ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राणी संरक्षण कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल असून ९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ८२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पीटा कायद्यान्वये एक गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक केली. ९५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
[read_also content=”मैत्री कॉम्प्युटरवर रेल्वे पोलिसांचा छापा, रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार केला उघड https://www.navarashtra.com/maharashtra/railway-police-raid-on-maitri-computer-black-market-of-railway-e-tickets-revealed-nraa-263572.html”]
स्फोटक पदार्थ बाळगणा-यांना अटक
चायनीज मांजा विक्रेत्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ६४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख दोन हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.