हडपसर : पुण्यातील हडपसर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने जोरदार (Heavy Rain in Pune) हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाने घामाघूम झालेल्यांना हवेत थंडावा मिळाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून कडक उन्ह त्यात गरमी, अंगाची लाहीलाही होत होती. दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली अन् हडपसरमधील रस्ते जलमय झाले.
हडपसरमधील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. विविध विक्रेते यांची पावसात त्रेधातिरपीट उडाली. अवकाळी पाऊस पडल्याने हडपसरमधील रस्त्यावर पावसाचे पाणीच पाणी साचलेले होते. पुण्यातील धनकवडी परिसरासह आसपासच्या परिसरात या पावसाने हजेरी लावल्याने गारवा निर्माण झाला होता.