चंद्रपूर : घुग्गुसमधील अमराई वॉर्डात गजानन मडावी यांचं घर आहे. शुक्रवारी दुपारची घटना. घरी कुणीच नव्हते. जोरदार भूस्खलन झाले. अख्ख घर जमिनीत सुमारे 70 फूट खोल गेले.शहरालगतच्या घुग्गुस येथे धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. कोळसा खाणींचा भाग असलेल्या या गावातील आमराई वार्डात एक उभे घर थेट सत्तर फूट खाली जमिनीत गडप झाले. या गावात सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/toll-waiver-for-ganesha-devotees-from-27th-august-to-11th-september-nrps-319790.html https://www.navarashtra.com/ganeshotsav/toll-waiver-for-ganesha-devotees-from-27th-august-to-11th-september-nrps-319790.html”]
गजानन मडावी (Gajanan Madavi) यांचे राहते घर अचानक हलू लागल्याने घाबरून जात घरातील सदस्य बाहेर पडले. काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप झाल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही धक्कादायक घटना प्रथमच उजेडात आली आहे. घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन (Mines Administration) व पोलिसांचे पथक (Squad of Police) दाखल झाले आहे. परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
[read_also content=”नायगाव स्थानकाजवळ सुटकेसमध्ये आढळला शाळकरी मुलीचा मृतदेह https://www.navarashtra.com/crime/the-body-of-a-schoolgirl-was-found-in-a-suitcase-near-naigaon-station-nrgm-319779.html”][blurb content=””]