मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, यावर आता माजीमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर (State government) जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातमध्ये का गेला याचे सरकारने आत्मपरिक्षण केलं पाहिजे. स्वत:साठी खोके व महाराष्ट्रासाठी धोके असे सरकारचे सुरु आहे, असा जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. (Shinde fadnvis government)
[read_also content=”आयस्ट्रीम कॉग्रेस परिषद, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावे – सुधीर मुनगंटीवार https://www.navarashtra.com/maharashtra/streaming-platforms-should-bring-indian-culture-and-knowledge-tradition-to-the-world-sudhir-mungantiwar-325818.html”]
दरम्यान, पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रायगडमध्ये येणारा बल्क ड्रग पार्क सुद्धा महाराष्ट्रातून गेला आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये का गेला याचे उत्तर सरकारकडे नाही, सरकार याचे ठोस उत्तर देईल असं वाटत होतं, मात्र असे झाले नाही. अजूनही यावर सरकारच उत्तर आलं नाही. या प्रकल्पासाठी मविआ सरकारने प्रयत्न केले होते. या सरकारला काय म्हणयाचे लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता, पण सरकारच्या नाकर्तेपणामुळं तरुणांचे हातून काम गेले आहे. जीत कर हारनेवाले को खोके सरकार कहते है, अशी या सरकारची अवस्था आहे अशी बोचरी टिका आदित्य ठाकरेंनी केली.