सौजन्य : सोशल मीडिया
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यांनी फोन देखील उचलला पण त्यावर ते बोलू शकले नाही. कारण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती’, असे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘या निवडणुकीत एक पाहिले तर भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत तसेच राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कोणाचा दुष्मन नसतो. कोणाचा भाऊ नसतो, राजकारणात जर तरला महत्व नसते. सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी निवडणूक आम्हीच मारलेली आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. चार तारीख ही प्रहारची आहे, आम्ही निवडणूक जिंकणार आहोत.
तसेच लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की, नवनीत राणा या निवडणुकीत पडणार आहेत आणि त्यांना रवी राणाच पाडणार आहेत. रवी राणांनी दोन वर्षे तोंड जरी बंद ठेवले असते तरी निकाल वेगळा राहिला असता, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.