Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: माळ्यावरून रेनकोट, छत्र्या बाहेर काढा! पुढील दोन दिवसांत पुणे अन्….

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 06:06 PM
Maharashtra Rain Alert: माळ्यावरून रेनकोट, छत्र्या बाहेर काढा! पुढील दोन दिवसांत पुणे अन्....

Maharashtra Rain Alert: माळ्यावरून रेनकोट, छत्र्या बाहेर काढा! पुढील दोन दिवसांत पुणे अन्....

Follow Us
Follow Us:

पुणेकरांना पुढील दोन दिवसांत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे
राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
राज्यातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी

पुणे: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पुढील दोन दिवसांत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे शहरासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील विविध भागांसाठी पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. २) पुण्यात कमाल ३८ अंश सेल्सिअस, तर किमान २४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना ऊन-सावलीचा अनुभव आला. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकणात सिंधुदुर्ग वगळता उष्ण व दमट वातावरण कायम राहणार असून दुपारी किंवा सायंकाळी काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडील सीमा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातील भागांतून पुढे सरकत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ३) पुण्यात कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Maharashtra Rain Alert: दोन दिवस छत्री घेऊनच फिरा; वादळी वारे अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा

पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ होऊ शकते. रविवारी शहरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारी कमाल तापमान ३७ अंशांवर स्थिर राहण्याची, तर किमान तापमान २५ अंशांपर्यंत किंचित घटण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: Imd heavy rain alert in pune maharashtra latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Rain
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार
2

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
3

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
4

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.