Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेत महत्त्वाची अपडेट; इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार
Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू झाली असून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली गतीमान केल्या आहेत. याअंतर्गत प्राप्तिकर विभागाकडे अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने आता राज्य सरकार आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली वेगात सुरू केल्या आहेत. प्राप्तिकर विभागाकडे याआधीच संबंधित माहितीचा अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने आता सरकार आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. ‘लाडक्या बहिणीं’शी संबंधित माहितीची गोपनीयता राखण्यासाठी हा करार केला जाणार आहे.
Todays Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्याचे दर पुन्हा नरामले, चांदीच्या किंमती स्थिर
आतापर्यंत बाद झालेल्या अर्जांची स्थिती
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – 2 लाख 30 हजार
वय 65 वर्षांपेक्षा अधिक असलेल्या महिला – 1 लाख 10 हजार
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेले, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी आणि स्वेच्छेने अर्ज मागे घेणाऱ्या महिला – 1 लाख 60 हजार
एकूण अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या – सुमारे 5 लाख
लाडक्या बहिणी झाल्या डोईजड
सरकारसाठी ‘लाडकी बहीण’ योजना आर्थिकदृष्ट्या डोईजड ठरू लागली आहे, हे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. या योजनेवर खर्च होणाऱ्या मोठ्या निधीमुळे राज्याच्या इतर विकासकामांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे गटातील काही मंत्रीही याबाबत खुलेपणाने मत व्यक्त करत आहेत.
सरकारी तिजोरी रिकामी असल्यामुळेच सध्याच्या 1500 रुपयांवर वाढ करून 2100 रुपये देण्याबाबत सरकारने कोणताही स्पष्ट निर्णय घेतलेला नाही. त्याउलट, अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना योजनेतून वगळण्याची मोहीमच सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ‘लाडकी बहिण’ लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.