Photo Credit- Social Media (नागपूर पॉलिटीक्स)
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्या पूर्वीही त्यांनी काही उमेदवारांच्या नावांचा घोषणा केली होती. त्यानंतरही त्यांनी नुकताच विदर्भाचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा केला. विदर्भाच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यात त्यांनी काही उमेदवारांची चाचपणी केली. या दौऱ्यातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार निश्चित केल्याची बातमी समोर आली आहे.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून त्यांनी मनसेचे 7 उमेदवारही जाहीर केले आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर त्यांनी गोंदिया, भंडाऱ्यातून विदर्भाच्या दौऱ्याला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. याशिवाय वणी मतदारसंघातही उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे विदर्भाच्या दौऱ्यात राज ठाकरेंनी जवळपास तीन उमेदवारांची घोषणा केली. म्हणजेच आता मनसेचे जवळपास सात उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा: डोळ्यात चटणी टाकून दागिने चाेरणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या; पंढरपूर पोलिसांची कारवाई
अशातच राज ठाकरेंच्या विदर्भाच्या दौऱ्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेने आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. नागपूरचे मनसेचे नेते तुषार गिरे यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध राज ठाकरेंचा उमेदवार निवडणुकीच्या मैदाना उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहेत.
राज ठाकरेंनी अमरावती दौरा आटोपल्यानंतर नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, अमरावती आणि नागपूर विभागातील 11 जिल्ह्याचा दौरा दोन दिवसांत पूर्ण करुन ते मुंबईकडे रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नागपूर आणि नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती आहे.
हेही वाचा: या झाडांना वाढवण्यासाठी मुळांची गरज भासणार नाही, सुंदर झाडे फक्त पानांपासून वाढवा घरी
दरम्यान, लोकसभा निवडणुकीदम्यान, राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत मात्र राज ठाकरेंनी वेगळे लढण्याची भूमिका स्वीकारली आहे. आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांनी माहिती दिली.नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तुषार गिरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. नवरात्री उत्सवानंतर मनसेकडून पुढील उमेदवारांची घोषणा केली जाईल. त्यामध्ये तुषार गिरेंच्या उमेदवारीची घोषणा केली जाईल. तुषार गिरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांना आव्हान देतील