औरंगाबादः मराठवाड्यातील दोन भाजपा नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांच्या (Dr. Bhagawat Karad) कार्यर्त्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. पकंजा मुंडेना उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयात राडा केला होता. या कथित समर्थकांना मारहाण केल्याप्रकरणी कराड यांच्या 8 समर्थकांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
[read_also content=”मोफत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अपहार ; उंब्रजच्या डॉक्टरला अभय तर फलटणचे डॉक्टर दोषी https://www.navarashtra.com/maharashtra/free-family-planning-surgery-abuses-abhay-is-the-doctor-of-umbraj-while-the-doctor-of-phaltan-is-guilty-nrab-291929.html”]
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या समर्थकांच्या नाराजीचा उद्रेक औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला. रविवारी दोन कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नूतन कॉलनीतील कार्यालयासमोर सायंकाळी घोषणा दिल्या. आपण पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दावा ते करत होते. यावेळी डॉ. भागवत कराड यांच्या समर्थकांनी त्यांना रोखत चांगलाच चोपही दिला. आता कथित समर्थकांना मारहाण केल्याप्रकरणी कराड यांच्या 8 समर्थकांवर कारवाई करण्यात आली आहे
पंकजा मुंडे यांचे काही समर्थक डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करणार असल्याच माहिती मिळताच अनेक भाजप कार्यकर्ते आणि डॉ. कराडांचे समर्थक भाजपाच्या कार्यालयासमोर गोळा झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांचे दोन समर्थक तेथे आले. यावेळी कराड यांच्या समर्थकांनीही या दोघांना बेदम चोप दिला. त्यातील एकाला पोलिसांच्या हवाली केले. तर दुसरा निसटला. दोन दिवसांपूर्वी सचिन डोईफोडे याच्यासह अन्य दोघांनी भाजप कार्यालयात राडा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रविवारी पुन्हा तो केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या कार्यालयावर राडा करण्यासाठी साथीदारासह आला.
[read_also content=”ईडी कार्यलयात पोहोचले राहुल गांधी, कार्यलयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांच आंदोलन https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-reached-the-ed-office-congress-workers-agitation-start-outside-the-ed-office-nrps-291907.html”]