• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Zee Marathi Paaru Serial Off Air Without Telecast Last Episode

झी मराठीचा धक्कादायक निर्णय; शेवटचा एपिसोड न दाखवताच ‘ही’ प्रसिद्ध मालिका अचानक केली बंद

झी मराठी वरील पारू मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण मालिकेचा शेवटचा भाग अद्याप प्रसारित न करताच चाहत्यांना मोठा धक्का मिळाला आहे. मालिका बंद करण्यात आली आहे असे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 15, 2026 | 11:51 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • झी मराठीचा धक्कादायक निर्णय
  • ‘Paaru’ मालिकेला अचानक ब्रेक
  • मालिकेच्या बातमीमुळे प्रेक्षक निराश
 
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘Paaru’ संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीआरपी नसल्यामुळे किंवा आर्थिक तोट्यामुळे मालिका अचानक बंद होणे ही गोष्ट नवीन नाही. मात्र एखाद्या मालिकेचे चित्रीकरणच अचानक थांबावे आणि शेवटचा भाग प्रसारितच होऊ नये, अशी वेळ क्वचितच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘पारू’च्या बाबतीत नेमके असेच काही घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयामागे टीआरपीची गणिते नसून कलाकार आणि तंत्रज्ञांचे थकीत मानधन हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून मालिकेशी संबंधित कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नव्हते. याबाबत निर्मात्यांकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. परिणामी, चित्रीकरण ठप्प झाले आणि मालिकेच्या कलाकारांना गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

Dhurandhar 2 आणि Toxic चा प्रदर्शनाआधीच धबधबा; रणबीरच्या Love & War ने पुढे ढकलली रिलीज डेट

दोन वर्षांच्या प्रवासात ‘पारू’ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कथानकातील भावनिक चढ-उतार, व्यक्तिरे खांची सखोल मांडणी आणि दमदार अभिनयामुळे मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र अपरिहार्य कारणांमुळे आणि उत्पादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे ही मालिका काही काळासाठी विश्रांती घेत असल्याचे वाहिनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लवकरच निरोपाचा शेवटचा आठवडा प्रसारित केला जाणार आहे आणि त्याबाबतची अधिकृत वेळ प्रेक्षकांना कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाहिनीकडून देण्यात आलेल्या निवेदनात, “मालिकेवरील प्रेमाबद्दल आम्ही प्रेक्षकांचे ऋणी आहोत. आम्ही नेहमीप्रमाणे दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रम देण्यास वचनबद्ध आहोत,” असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ‘पारू’चा शेवटचा भाग त्याच वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेसोबत ‘महासंगम’ भागाच्या स्वरूपात प्रसारित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत झी मराठीचा टीआरपी आकडा वाढल्याचे दिसत आहे. प्राइम टाइममध्येही वाहिनीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या ‘लक्ष्मी निवास’, ‘तारिणी’, ‘तुला जपणार आहे’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच ‘पारू’बाबत घेतलेल्या या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.

अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा! Jana Nayagan बद्दल समोर आली मोठी अपडेट; कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

‘पारू’ मालिकेबद्दल सांगायचे झाले तर, या मालिकेमध्ये शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मुग्धा कर्णिक यांनी अहिल्यादेवीची प्रभावी भूमिका साकारली होती. श्वेता शिंदे या मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसल्या, अभिनेत्रीच्या लक्षवेधी कामगिरीने चाहत्यांचे मन देखील जिंकले. या सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकली. आता मात्र या मालिकेच्या अचानक थांबण्यामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, शेवटचा भाग कधी आणि कसा प्रसारित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Zee marathi paaru serial off air without telecast last episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Dhurandhar 2 आणि Toxic चा प्रदर्शनाआधीच धबधबा; रणबीरच्या Love & War ने पुढे ढकलली रिलीज डेट
1

Dhurandhar 2 आणि Toxic चा प्रदर्शनाआधीच धबधबा; रणबीरच्या Love & War ने पुढे ढकलली रिलीज डेट

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी
2

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा! Jana Nayagan बद्दल समोर आली मोठी अपडेट; कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
3

अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा! Jana Nayagan बद्दल समोर आली मोठी अपडेट; कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल
4

O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न

Feb 15, 2026 | 11:51 AM
दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

Feb 15, 2026 | 11:51 AM
झी मराठीचा धक्कादायक निर्णय; शेवटचा एपिसोड न दाखवताच ‘ही’ प्रसिद्ध मालिका अचानक केली बंद

झी मराठीचा धक्कादायक निर्णय; शेवटचा एपिसोड न दाखवताच ‘ही’ प्रसिद्ध मालिका अचानक केली बंद

Feb 15, 2026 | 11:50 AM
Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

Feb 15, 2026 | 11:43 AM
खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

Feb 15, 2026 | 11:43 AM
उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

Feb 15, 2026 | 11:40 AM
दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

Feb 15, 2026 | 11:31 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.