File Photo : Physical Harassment
नागपूर : इन्स्टाग्राम मित्राने (Instagram Friend) अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. एकांतातील क्षणांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करत राहिला. प्रतापनगर हद्दीत ही घटना उघडकीस आली असून, पीडितोच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
नंदू डोहाले (वय 21) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने तांत्रिक शिक्षण घेतले. मात्र, काम मिळत नसल्याने बेरोजगार आहे. 17 वर्षीय पीडिता बारावीत शिकते. 11 महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. नंदूने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती मैत्रीखातर त्याला भेटायची. एकमेकांच्या घरी सुध्दा ये-जा होती. नंतर मात्र नंदू तिला इमोशनल ब्लॅकमेल करून ठिक ठिकाणी बोलवायचा. मित्राच्या रुमवर नेऊन तिच्यावर अत्याचार करायचा. अशा पध्दतीने त्याने वारंवार अत्याचार केला.
मोबाईलवर या क्षणाचे चित्रणही केले. या क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तिला मारहाण केली. सततच्या धमक्यांना कंटाळून पीडितेने कुटुंबियांना सुरू असलेल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबाकडून हिंमत मिळाली तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को, अत्याचारासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली.






