
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Jalgaon Farmers Face Crisis : सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे; त्यात 36 जिल्ह्यापैकी 32 जिल्ह्यात म्हणजे 358 पैकी 255 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहिर केला आहे. या पैकी दुष्काळग्रस्त भागामध्ये 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये सुमारे 74 ते 75 टक्के इतका दुष्काळ जाहीर केला आहे. या मुळे शेतकऱ्यांना या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.
जळगावातील चोपडा तालुक्यात मक्का उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसला आहे. जळगावातील चोपडा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतातील पिकांची परिस्थिती ही बिकट आहे. पाऊस कमी पडल्यामुळे मक्का उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.त्याच बरोबर पिकांची वाढ योग्यरित्या न झाल्याने उत्पादनावर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यात दुष्काळ असल्याने या वर्षी मक्याचे उत्पन कमी झाले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने मक्का उत्पादनावर सुध्दा याचा परिणाम होत आहे. तर याचा फटका बाजारात सुध्दा बसला आहे. मक्काउत्पादन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने; शेतीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. कापणी साठी मजुरांना द्यायला पैसे सुध्दा नाही आहेत.
मक्याची कणसे तोडणे, ती गोळा करणे यासाठी मजुरांची मदत लागते, यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च द्यावा लागतो; आता मशीनच्या साहाय्याने मका काढणी सुरू असून त्यासाठीही अतिरिक्त खर्च होत आहे. तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने मक्का बाजारपेठेत नेण्यासाठीही खर्च करावा लागणार आहे. असे मत मक्का उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.
मक्का उत्पादक शेतकऱ्याना बाजारात काय भाव मिळणार हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यंदा दुष्काळा बरोबर पावसाअभावी मक्का उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे.
राज्यसरकारने शेतकऱ्यांना दुष्काळात आर्थिक सवलती आणि उपाययोजना करून देणे गरजेचे आहे, या मध्ये शेतकऱ्यांसाठी पीक कर्जांचे पुनर्गठन, कृषी पंपांच्या वीज बिलात सवलती, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी परीक्षा शुल्क माफ करणे गरजेचे आहे.पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता करणे, तर शेतकऱ्यांसाठी शासनाने काही योजना केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजने अंतर्गत जास्तीत जास्त योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करणे गरजेचे आहे.