Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News: जालना जिल्हा परिषद-पंचायत समित्यांवर भगवा फडकवा; डॉ. श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश

जालना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी जालन्यातील शिवसंवाद दौऱ्यात केले. मतदार याद्या पुनरीक्षण, बीएलएंची भूमिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 06:04 PM
जालना जिल्हा परिषद-पंचायत समित्यांवर भगवा फडकवा; डॉ. श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश

जालना जिल्हा परिषद-पंचायत समित्यांवर भगवा फडकवा; डॉ. श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश

Follow Us
Follow Us:
  • जालना जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा
  • शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जालना जिह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश
  • मराठवाड्यात खासदार डॉ. शिंदेंचा झंझावाती शिवसंवाद दौरा
जालना : जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यादृष्टीने शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागा, असे निर्देश शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. खासदार डॉ. शिंदे शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी आणि परतूर विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी खासदार संदीपान भुमरे, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

जालना शहरात झालेल्या बैठकीत खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील मतदार शिवसेनेसोबत आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात अनेक योजना आणि भरघोस विकास निधी दिला. मराठवाड्यातून महायुतीचे ४० आमदार निवडून आले होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार मराठवाड्यात आहेत. आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फाकवण्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागा असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

कार्यकर्ता काय काम करत असतो याची नोंद पक्ष नेतृत्व घेत असते असे ते म्हणाले. मतदार याद्या पुनरीक्षणासाठी पक्षाने जे बीएलए नियुक्त केले आहेत त्यांनी एसआयआर सुरू होताच बीएलओ सोबत घरोघरी जावे. आपल्या मतदाराचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करावी अशा सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिल्या. जालना जिल्हा परिषदेचे ५७ गट असून ८ पंचायत समित्यांचे ११४ गण आहेत. ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लांबणीवर पडली आहे. तत्पूर्वी खासदार डॉ. शिंदे यांची जालना शहरातील उद्योजक आणि डॉक्टर यांच्यासमवेत बैठक झाली.

घनसावंगी येथे झालेल्या दुसऱ्या आढावा बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी तालुका प्रमुख आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी शिवसेना आमदार हिकमत उढाण व मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार आनंद परांजपे, जयदीप बोराडे उपस्थित होते. परतूर आणि घनसावंगी मतदार संघात सर्व बीएलएची नियुक्ती झाली आहे. लवकरच त्यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाईल, असे आमदार उढाण म्हणाले. जिल्हा परिषदेवर परतूर आणि घनसावंगी मधून जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी मजबुतीने प्रयत्न करावेत, असे मत खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसंवाद दौऱ्यातून पक्षाचे खासदार, आमदार , मंत्री काम करतात की नाही याचा आढावा थेट कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. हा अहवाल थेट शिंदे साहेबांना सादर केला जात असल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळतो असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

खासदार डॉ. शिंदे तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसंवादच्या निमित्ताने तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून ते जालना, नांदेड ,हिंगोली आणि बीड या जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदार संघांचा आढावा घेणार आहेत.

MLC Election 2026: महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल! भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार

Web Title: Dr shrikant shinde jalna zilla parishad panchayat samiti shiv sena meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Jalna
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Kalyan News: गणेशोत्सवासाठी १ हजार गाड्यांचे नियोजन, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते तिकीट वाटप
1

Kalyan News: गणेशोत्सवासाठी १ हजार गाड्यांचे नियोजन, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते तिकीट वाटप

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
2

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
3

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.