Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : पाणी समस्या सोडविण्यासाठी धरण गरजेचे…, कल्याण ग्रामीणच्या आमदारांनी केली उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kalyan-Dombivli water Issue : कल्याण डोंबिवली शहरासाठी नवे धरण हवे असल्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2025 | 06:22 PM
कल्याण ग्रामीणच्या आमदारांनी केली उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण ग्रामीणच्या आमदारांनी केली उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:

Kalyan-Dombivli water Issue News Marathi: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. वाढते नागरीकरण पाहता उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरासाठी नवे धरण हवे असल्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या प्रसंगी मंत्री भरत गोगावले आणि आमदार शरद सोनावणे उपस्थित होते.

मटका अड्ड्यासाठी पंटर अन् एजंटचं जाळं..;तरूण-तरूणी कामाला लावले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले

कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या वाढत आहे. आजमितीस दोन्ही शहरांसह कल्याण ग्रामीणमधील २७ गावे धरुन २० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. त्याचबरोबर मोहिली, बारावे आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रे आहे. ही योजना राबविण्यात आली तेव्हा २७ गावे महापलिकेत नव्हती. २७ गावे २०१५ साली समाविष्ट केली गेली. २७ गावांकरीता पाणी वितरण सक्षम करण्यासाठी अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र २७ गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्या पोटी महापालिका एमआयडीसीला पाण्याचे बिल अदा करते.

उन्हाळ्यात नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा पोहचतात. त्यावर तोडगा काढण्याकरीता स्वतंत्र धरण हवे. महापालिका उल्हास आणि काळू नदीतून पाणी उचलून ते शुद्ध करुन नागरीकाना पुरविते. उल्हास नदीतून पाणी उचलण्याचा कोटा राज्य सरकारने ठरवून दिला आहे. मात्र मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिका उचलते. पाण्याची भविष्यातील गजर पाहता जलसंपदा विभागाकडून अभ्यास करुन अहवाल मागविण्यात यावा. त्या अहवालानुसार उच्चस्तरीय मान्यता देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. धरण बांधण्यासाठी फिजीबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्याकरीता महापालिका आयुक्तांना तसे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार मोरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

ही चड्डी बनियान गँग! आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून निलेश राणे सभागृहातच भिडले, म्हणाले, हिंमत असेल तर…

Web Title: Kalyan dombivli water problem requires a dam the mla from kalyan rural has made a request to the deputy chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan news
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
1

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
3

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना
4

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.