माथेरान/ संतोष पेरणे : माथेरान शहरात बालवाडी संस्कृती अजूनही टिकून असून महाराष्ट्र राज्यात १९७२ मध्ये पहिल्यांदा बालवाडी सुरु करणाऱ्या सुहासिनी सावंत यांनी माथेरान शहरातील तिन्ही बालवाडीमध्ये येणारी बालकांच्या मेळाव्याला हजेरी लावली.दरम्यान,बाळाच्या संगोपनात बालवाडी अत्यंत महत्वाची असून बालवाडी संस्कृती टिकली पाहिजे असे आवाहन सुहासिनी सावंत यांनी केले.
माथेरान शहरात बालवाडी आणि अंगणवाडी यांच्या माध्यमातून पोषण माह सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्यात पहिली बालवाडी मुंबई शहरात सुरु करणाऱ्या सुहासिनी सावंत यांनी माथेरान शहरातील बालवाडी पोषण सप्ताहाला हजेरी लावली.पोषण माह सप्ताह मधील आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस कार्यक्रमाचे आयोजन माथेरान शहरातील हुतात्मा भाई कोतवाल शैक्षणिक संकुलातील बालवाडी केंद्रात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी सुहिता ओव्हाळ.राज्यात पहिली बालवाडी सुरु करणारे सुहासिनी सावंत,मुख्य सेविका रोहिणी अधिकारी यांच्यासह माथेरान शहरात अंगणवाडी केंद्राच्या सुरेखा जमदाडे,रमा आखाडे आणि स्मिता गायकवाड तसेच मदतनीस मनीषा दळवी,शबाना महापुळे,मनीषा शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.या पोषण मह सप्ताहाच्या समारोप प्रसंगी माथेरान शहरातील बी जे रुग्णालय आरोग्य सेविका तसेच मैत्री ग्रुप चे महिला सदस्य उपस्थित होते.
आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करताना राज्यात बालवाडी संस्कृती आणणाऱ्या आणि देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते सुहासिनी सावंत यांना सन्मानित केलं होतं. त्यामुळे ही आठवण कायम ठेवत त्यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात कॉन्व्हेंट स्कुल,प्ले ग्रुप या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवण्यावर भर दिसून येत आहे. मात्र पालकांनी बालवाडी शाळा आणि केंद्र हे सर्वांसाठी महत्वाचे असून बालवाडीमध्ये आपल्या बालकाला चांगले संस्कार होतात,बाळाची वाढ होत असताना त्यांच्या मातांना सकस आणि गरजेचं पोषण आहार दिला जातो. बालवाड्या टिकवणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी पालकांनी पुढे येण्याची गरज सुहासिनी सावंत यांनी बोलून दाखवली.या कार्यक्रमात पालक म्हणून कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे विविध खेळ साजरे झाले.तर पोषण आहाराबद्दल माहिती देणारे पोषण आहाराचे स्टॉल त्या ठिकाणी मांडण्यात आले होते.