(फोटो सौजन्य: Instagram)
भारताच्या लोकप्रिय वाहनांमध्ये रिक्षाचा प्रामुख्याने समावेश होतो. परवडणाऱ्या किमतीतला हा प्रवास अनेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण सर्वांनी रिक्षाचा प्रवास कधी ना कधी केला असेलच. पण नुकताच एका अनोख्या रिक्षाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रिक्षावाल्याने आपल्या रिक्षाला इतक्या अनोख्या पद्धतीने सजवलेलं असतं की पाहून सर्व दारूडे या रिक्षाकडे क्षणातच आकर्षित होतात. यूजर्स ही रिक्षा नक्की कुठे आहे याची मागणी करु लागतात. चला तर मग या रिक्षात असं काय अनोखं दिसून आलं ते जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका अनोख्या रिक्षाचे अद्भूत आणि थक्क करणारे दृश्य दिसून आले. व्हिडिओमध्ये, रिक्षात रिक्षावाला फार थाटात बसला असूल त्याने रिक्षाच्या प्रत्येक जागेवर दारुच्या बाटल्या सजवून ठेवलेल्या असतात. रिक्षा पूर्णपणे दारुच्या बाटल्यांनी भरलेली असते जे पाहून सर्वच थक्क होतात तर अल्कहोलप्रेमी हा रिक्षावाला नक्की कुठे भेटेल याची मागणी करु लागतात. या रिक्षा राईडला आणखीन मजेदार बनवण्यासाठी यात लाहन फ्लाॅवर पाॅट आणि टीशू पेपर देखील ठेवण्यात आलेले असतात. रिक्षावाल्याचा हा अनोखा पराक्रम आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक आता याला चालतं फिरतं दारुचं दुकान असल्याची उपमा देत आहेत.
या अजब-गजब रिक्षाचा व्हिडिओ @kr1shhha नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ड्राय डेला या रिक्षाची मागणी खूप जास्त असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुठे मिळणार असे रिक्षावाले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नेहमीच्या ग्राहकांसाठी पास तयार करण्यात यावा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.