कर्जत/ संतोष पेरणे: तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेसाठी महत्वाची असलेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्यसाठी योगदान देत आले आहे.मात्र तेच ग्रामीण रुग्णालय हे अनेक समस्यांनी व्यापले आहे. काही महिन्यापासून तेथील नेत्र विभागात डॉक्टरच नाही अशी स्थिती झाली आहे.त्यामुळे नेत्र दोष असलेल्या रुग्णांना कोणतीही सुविधा मिळत नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण रुग्णालय कशेळे यामध्ये बहुतांशी आदिवासी आणि दुर्गम खेड्यातील रुग्ण येत असतात.आदिवासी भाग असलेल्या कशेळे ते खांडस, कशेळे ते आंबिवली,मेचकरवाडी,तसेच पिंपळोळी, गुढवण, सुगवे, लोभेवाडी, ताडवाडी, वारे, लाखाचीवाडी, जांबुळवाडी अशा अनेक गावांमधून पंधरा ते वीस किलोमीटर प्रवास करून हॉस्पिटलमध्ये येत असतात.अशा येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घालावी अशी मागणी आदिवासी भागातून होत आहे.कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्र विभागात डॉक्टर नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त करत आहेत. नागरिकांना डोळ्यांच्या अनेक समस्या भेडसावत असतात. नेत्र तपासणी, चष्मे वाटप करणे, अशा अनेक प्रकारचे नागरिकांची होणारी सोय बंद झाली आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन नेत्र विभागात डॉक्टर उपलब्ध करून द्यावे ही मागणी होत आहे.31 मार्च 2025 पासून नेत्र विभागातील डॉक्टर यांचे रिटायरमेंट झाल्यामुळे आतापर्यंत सात महिने झाले.त्यामुळे एकप्रकारे नेत्र विभाग सेवा बंद आहेत. ती सेवा सुरू होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांकडून वारंवार मागणी केली जात आहे.
आमचं ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे सर्वसामान्य व आदिवासी बांधव येथे मोठ्या प्रमाणात उपचार घेत असतात. येथे प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टर्स दंत विभागासाठी डॉक्टर्स उपलब्ध आहेत परंतु डोळे तपासण्यासाठी व डोळ्यावरील उपचारासाठी सात महिने झाले डॉक्टर उपलब्ध नाहीत आम्ही आमच्या डोळ्यांच्या समस्या घेऊन येत असतो परंतु येथे डोळ्यांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याने आम्हाला परत जावे लागते. ती वेळ यावी नाही म्हणून येथे डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावे हीच आमची सरकारकडे मागणी आहे.