फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये भरती करण्याची इच्छा असेल तर कसलाही वेळ न दडवता या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर यांसारख्या विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या क्षेत्रात अनुभव असल्यास त्वरित भरतीचा लाभ घेण्यात यावा. एकूण ९३८ रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
७ ऑक्टोबरपासून या भरतीची सुरुवात झाली आहे, तर उमेदवारांना २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. या भरतीत क्लर्क-टायपिस्टसाठी ८५२, टॅक्स असिस्टंटसाठी ७३, इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी ९ आणि टेक्निकल असिस्टंटसाठी ४ अशी पदे उपलब्ध आहेत. या सर्व पदांसाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयो मर्यादे संदर्भात आहेत.
इंडस्ट्री इन्स्पेकटर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे अभियांत्रिकीमीमध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर इतर उर्वरित सर्व पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव यासंबंधी सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत दिली आहे, त्यामुळे उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतनमानधन देण्यात येणार आहे. इंडस्ट्री इन्स्पेक्टर पदासाठी वेतनश्रेणी ₹35,400 ते ₹1,12,400, टेक्निकल असिस्टंटसाठी ₹29,200 ते ₹92,300, टॅक्स असिस्टंटसाठी ₹25,500 ते ₹81,100, तर क्लर्क-टायपिस्टसाठी ₹19,900 ते ₹63,200 अशी राहील.
MPSC स्पर्धा परीक्षा असल्याने तिला एक कठीण आणि महत्वाची परीक्षा मानली जाते. या भरतीमध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करत. मुलाखत तसेच दस्तऐवजांची पडताळणीलाही पार करावे लागणार आहे. संबंधित माहिती लवकरच MPSC च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये केली जाईल. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही भरती एक उत्तम संधी ठरणार आहे.