(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सलमान खान आठवड्याच्या शेवटी “बिग बॉस १९” मध्ये ‘वीकेंड का वार’ होस्ट करताना दिसतो. आजच्या भागातही अभिनेता स्पर्धकांना बरोबर मज्जा मस्ती करताना दिसणार आहे. तसेच नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची माहिती देताना दिसला आहे. वीकेंड का वार एपिसोडचा हा प्रोमो चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तान्या मित्तल आणि मृदुल तिवारी, कुनिका आणि नीलम गिरी यांचे एकमेकांबरोबर वाद होताना दिसत आहे.
दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीनंतर ‘या’ अभिनेत्रीने केली ‘वीक ऑफ’ची मागणी!
“चमचा” म्हटल्यावर मृदुल तिवारी भडकला
प्रोमोमध्ये दिसत आहे की सलमान खानने स्पर्धकांना म्हटले की घरामध्ये कोणता स्पर्धक ‘चमचा’ वाटत आहे. तान्या मित्तल लगेचच मृदुल तिवारीचे नाव घेते. हे ऐकून तो संतापतो आणि म्हणतो, “मी कोणाचा चमचा नाही.” प्रोमोमध्ये तो खूप रागावलेला दिसत आहे.
कुनिका आणि नीलम गिरीमध्ये वाद
कुनिका पुढे नीलम गिरीला चमचा म्हणते आणि बोलते तिच्या मनातले ती मांडू शकत नाही. यामुळे नीलमला राग येतो. ती म्हणाली, “जर मी माझ्या मनातले बोलले तर तुम्हाला ते ऐकू येणार नाही.” नीलम आणि कुनिका सदानंद बराच वेळ या विषयावर वाद घालत राहतात आणि शेवटी नीलम रडताना दिसत आहे.
‘नवीन नावासोबत पुन्हा परंतु…’, विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं, आता पुन्हा रिलीज कधी?
कोणता स्पर्धक जाईल घराबाहेर
हा वीकेंड का वार स्पर्धकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांमध्ये झीशान कादरी, नीलम गिरी, बसीर अली, अशनूर कौर, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांचा समावेश आहे. वीकेंड का वार एपिसोडमध्ये त्यापैकी एकाला घरातून बाहेर काढले जाणार आहे. तणाव वाढत असताना आणि सलमानच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेमुळे खळबळ उडाली असताना, या वीकेंडच्या वारला घराबाहेर कोण जातंय हे पाहून उत्सुकतेचा असणार आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार यावेळी झीशान कादरी शोमधून बाहेर पडणार आहे.