Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : कास पठारावरील बांधकामांवरून नवा वाद; सिमेंट वापराच्या आरोपांमुळे जागतिक वारसा दर्जावर प्रश्नचिन्ह?

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सिमेंटचा वापर केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. मात्र उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सिमेंटचा वापर झालेला नसून या कामांमुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 12:25 PM
कास पठारावरील बांधकामांवरून नवा वाद; सिमेंट वापराच्या आरोपांमुळे जागतिक वारसा दर्जावर प्रश्नचिन्ह?

कास पठारावरील बांधकामांवरून नवा वाद; सिमेंट वापराच्या आरोपांमुळे जागतिक वारसा दर्जावर प्रश्नचिन्ह?

Follow Us
Follow Us:
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जाला धोका?
  • कास पठारावरील बांधकामांवर ग्रामस्थांचे गंभीर आरोप
  • ‘सिमेंटचा वापर नाही’ वन विभागाचा दावा
कास पठार: सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील विकासकामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. कास पठारावरील फुलांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सिमेंटचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. मात्र, सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी हे आरोप फेटाळून लावत, या कामांमध्ये सिमेंटचा वापर केलेला नसून युनेस्कोने दिलेल्या जागतिक वारसा स्थळाच्या दर्जावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

२०१२ मध्ये मिळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

कास पठाराला २०१२ साली युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. हा दर्जा मिळविण्यामागे स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध संस्थांचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. त्यानंतर कास पठार परिसरातील स्थानिक वन समित्यांकडे व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली.

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

पर्यटक सुविधांसाठी कायमस्वरूपी कामांची मागणी

२०१२ ते २०२५ या कालावधीत स्थानिक वन समित्यांनी पर्यटकांच्या सोयीसाठी काही कायमस्वरूपी सुविधा उभारण्याची मागणी वन विभागाकडे सातत्याने केली होती. मात्र, युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फुलांच्या क्षेत्रात सिमेंटचा वापर करून कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही, असे वन विभागाचे अधिकारी यापूर्वी स्पष्ट करत होते.

संवर्धन आराखड्यानुसार कामांना सुरुवात

दोन-तीन वर्षांपूर्वी तत्कालीन उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या कार्यकाळात कास पठार संवर्धन आणि पर्यटक व्यवस्थापनासाठी आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्याअंतर्गत सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. वन विभागाच्या मते ही सर्व कामे पर्यावरणपूरक पद्धतीने केली जात असून त्यासाठी सिमेंटचा वापर केलेला नाही.

ग्रामस्थांचा गंभीर आरोप

मात्र स्थानिक ग्रामस्थांचा दावा वेगळाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कास पठारावर सिमेंटच्या पोत्यांचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात बांधकामांमध्ये सिमेंटचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंजूर आराखड्यात पर्यावरणपूरक कामांना परवानगी असताना सिमेंटचा वापर होत असेल, तर भविष्यात फुलांच्या अधिवासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

फुलांच्या संवर्धनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

ग्रामस्थांनी यापूर्वीही कास पठारावर उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे फुलांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तत्कालीन सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी काही ठिकाणच्या जाळ्या हटविण्याचे निर्देश दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न

कास पठाराबाबत अधिकारी बदलतात तसे नियमही बदलत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या संवेदनशील जागतिक वारसा स्थळावर सुरू असलेल्या कामांची स्वतंत्र चौकशी करून पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच लोकप्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या वन विभाग सिमेंट वापराच्या आरोपांचे खंडन करत असला, तरी स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कास पठारावरील विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात समतोल राखण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहीम संपन्न! पर्यटन स्थळवरील पर्यटक मुलांसाठी चार केंद्रावर डोस

Web Title: Kas pathar construction cement controversy unesco world heritage satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Kas Pathar
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.