पीयूसी काढा अन्यथा भरावा लागेल दंड !
छत्रपती संभाजीनगर : आपण वापरत असलेल्या वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र अद्यावत आहे का? नसेल तर लगेच करून घ्या. अन्यथा जबर दंड भरावा लागू शकतो. आरटीओ कार्यालयाने आठ महिन्यांत पीयूसी नसलेल्या 2380 वाहनधारकांकडून दंड वसूल केला आहे. वाहनाचे पीयूसी नसल्यास अपघात झाल्यास दावा फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे वाहनाच्या पीयूसीकडे दुर्लक्ष करणे वाहनमालकाला महागात पडू शकते.
आजघडीला अनेक वाहने धूर सोडत दामटल्या जातात. अशी वाहने शिवाय वाहन मालकाच्या खिशालाही भुर्दंड पाडणाऱ्या ठरू शकतात. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना पर्यावरांसाठी हानीकारक तर असतातच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे कायद्याने अनिवार्य आहे. तुम्ही प्रदूषण नियंत्रण मानकांचे पालन करत आहात याची खात्री करण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. पीयूसी नसलेल्या वाहनाला पोलिस अथवा आरटीओ कार्यालयाच्या तपासणीत जबर दंड भरण्याची वेळ येते.
केंद्रीय मोटार वाहन अधिनियम मोटार वाहन कायद्यानुसार देशातील प्रत्येक मोटार वाहनासाठी बीएस-१, बीएस-२, बीएस-३, बीएस ४, सीएनजी आणि एलपीजी अशा सर्वच वाहनांना पीयूसी बंधनकारक आहे. पीयूसी नसल्याने अपघाताचा दावा फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येक वाहनधारकाने अगदी कमी पैशांत पीयूसी प्रमाणपत्र काढून जबर दंडातून मुक्तता करून घेणे आवश्यक आहे.
क्लेम फेटाळण्याची शक्यता
पीयूसी हे वाहन आणि वाहनधारकासाठी तसेच प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनधारकाने पीयूसी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. पीयूसी नसेल तर जबर दंडाची तरतूद आहे. मोटार वाहनाचा क्लेम फेटाळला जाण्याची शक्यताही असते.
पीयूसी आहे तरी काय?
प्रमाणपत्राशिवाय वाहनचालक रस्त्यावर पकडला गेल्यास त्याला दंड, सहा महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. त्यामुळे पीयूसी काढणे आवश्यक ठरते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी म्हटले आहे. वाहनातीळ धुरामुळे वातावरणात प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी आहे. पीयूसी तपासणीत वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वेगवेगळ्या वायूंची चाचणी केली जाते.