Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले

गोकुळ दूध संघाच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप संस्था प्रतिनिधींनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 01:00 PM
Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले
Follow Us
Follow Us:
  • दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ;
  • ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप संस्था प्रतिनिधींनी केला आहे. एका दिवसात 170 सुनावण्या घेणारे प्रशासन उर्वरित 481 संस्थांसाठी 70 ते 75 दिवसांचा अवधी का मागत आहे, असा सवाल उपस्थित करत, ही प्रक्रिया राजकीय द्वेषातून सुरू असून संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आज सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांना निवेदन देऊन तातडीने सुनावणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

बदली आणि सुनावणीत खोडा
दिनांक 7एप्रिलपासून सुनावणीचे कामकाज सुरळीत सुरू असतानाच 16 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधकांची अचानक बदली करण्यात आली. या बदलीनंतर दोन दिवस कामकाज जाणीवपूर्वक लांबवण्यात आले. राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील अनेक संस्थांना अद्याप नोटिसाही बजावण्यात आलेल्या नाहीत. संस्थांना सुनावणीपासून अलिप्त ठेवून त्यांना थेट अवसायनात काढण्यासाठीच हा प्रशासकीय खेळ सुरू असल्याचा संशय दूध संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

Educational News: मराठी शाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव;  नेमकं काय आहे प्रकरण?

पारदर्शकतेचे आव्हान
यांना या संस्थांच्या वैधतेबद्दल शंका आहे, त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन कागदपत्रांची पडताळणी करावी आणि पत्रकारांसमोर आपले म्हणणे मांडावे, असे खुले आव्हानही यावेळी देण्यात आले. उच्च न्यायालयाचे कोणतेही निर्देश नसताना केवळ राजकीय दबावापोटी सुनावणी लांबवून ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया थांबवली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विकास पाटील कुरुकली, युवराज पाटील बामणी, राजेखान जमादार मुरगुड, दत्तात्रय पाटील केनवडे, राजू जाधव, शेखर देसाई, संजय कलिकते, निवास पाटील, के. बी. पाटील, बाबासो रणसिंग, विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

‘गोकुळ’च्या संकलनात संस्थांचा मोठा वाटा
या 1200 संस्था दररोज किमान 2 लाख लिटर दूध गोकुळ संघाला पुरवतात. संघाच्या 20 लाख लिटर संकलनाच्या टप्प्यात या संस्थांचा कणा मोलाचा आहे. केवळ राजकीय हेतूने या संस्थांना अडचणीत आणल्यास त्याचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला बसणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

Sangali News : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या ऐरणीवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार,आमदार रोहित पाटील यांचा पाहणी दौरा

Web Title: Kolhapur news delay in hearing of milk institutions politics heats up over gokul resolutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Gokul Milk
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
1

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
2

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
3

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
4

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.