Business Man Of Hupari Is In Tension Due To Silver Theft Nrka
हुपरीतील ‘चांदी लुटीने’ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
रेंदाळ (ता.हातकणंगले) येथे बिरदेव नगरच्या माळावर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गाडी आडवी मारुन त्याच्याजवळ असलेली सुमारे पाच लाख रुपयांची चांदीची पिशवी लुटण्याची घटना घडली होती.
हुपरी : रेंदाळ (ता.हातकणंगले) येथे बिरदेव नगरच्या माळावर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गाडी आडवी मारुन त्याच्याजवळ असलेली सुमारे पाच लाख रुपयांची चांदीची पिशवी लुटण्याची घटना घडली होती. याप्रकरणी सहा संशयितांना हुपरी पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी कौतुकास्पद कामगिरी करत ४८ तासांतच तत्काळ छडा लावला. मात्र, या घटनेमुळे शेकडो वर्षांपासून फक्त शब्दांवर चालत आलेल्या चांदी व्यवसायाला डाग लागला असून, चांदी उद्योजकांनी दक्ष राहणे गरजेचे बनले आहे.
हुपरी या चंदेरी नगरीत गेल्या शेकडो वर्षांपासून पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत व्यवसाय केला जातो. सध्या जागतिक बाजारपेठेत चांदी दरात होणारे चढ-उतार, परपेठेत जाताना पोलीस, चोरांची भीती, कोरोना महामारीमुळे दोन वर्षे व्यवसाय ठप्प अशा अनेक कारणांमुळे मेटाकुटीला आलेल्या चांदी उद्योगावर नुकसानीची गडद छाया पसरलेली असताना व्यवसाय आता कुठे चालू होत आहे. तोपर्यंत हुपरीत चांदीची पिशवी लुटण्याचा प्रकार घडला.
दरम्यान, या पाच लाख रुपये किंमतीच्या चांदीच्या पिशवी लुटीत हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे किरण भोसले, प्रमोद कदम व त्याच्या कर्मचाऱ्यांनी केलीली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.
आमची चांदी पिशवी लुटीचा जो प्रकार घडला तो अतिशय दु:खद असून, ही घटना चांदी व्यवसायाला मारक आहे. चांदी व्यवसाय अडचणीतून जात असताना अशा घटनांनी व्यवसायिकांत भीतीचे वातावरण असून, यामधून धडा घेऊन उद्योजकांनी दक्ष राहून व्यवसाय करावा.