मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे मोठे यश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
राज्यभरात महायुतीची विंजयी घौडदौड
Zp Election And Pancyat Samiti Elections: आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. राज्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. दरम्यान यावर आता राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात भाजपला मिळालेल्या यशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवला आहे. 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तसेच महायुतीचीच सत्ता येईल हे अतिशय स्पष्ट झाले आहे. 60 ठिकाणी भाजप एक नंबरचा पक्ष आहे. शिवसेना दोन ठिकाणी तर राष्ट्रवादी कॉँग्रेस एका ठिकाणी एका नंबरवर आहे.”
🕠 5.30pm | 9-2-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/TpDdpyysFe — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 9, 2026
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अतिशय चांगला कल समोर आला आहे. भाजपने 2017 चा स्वतःचा रेकॉर्ड मोडला आहे. 2017 मध्ये 141 जागा होत्या तर आता निकाल पूर्ण येईपर्यंत 236 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीचे दु:ख आम्हाला आहे. त्यामुळे मी स्वतः प्रचार न करण्याचा निर्णय घेतला.”
“मी आमचे दोन्ही सहकारी पक्षाचे मी अभिनंदन करतो. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, राज्यातील जनतेचे आभार मानतो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण कर्णीसाठी योग्य कारभार करू असे आश्वासन देतो”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक जे विधान करतात. त्यावर आम्ही विधान करत नाही. मत व्यक्त करत नाही. ते बोलतात ते दिशादर्शक असे असते. त्यावर कोणती भाष्य करणे ही प्रथा नाहीये.विरोधी पक्ष केवळ माध्यमांमध्ये दिसतो, मात्र जनतेत दिसून येत नाही. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये निर्णय होईल.”
जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात “मिनी-असेंब्ली” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज (09 फेब्रुवारी) जाहीर होत आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीच्या या निवडणूक लढाईत भारतीय जनता पक्षाने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही १०० जागांचा आकडा ओलांडला आहे.






