Photo Credit- Team Navrashtra
मुंबई: ‘देशातील सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्यांचा अपमान करणं, वारंवार देवदेवतांचा अपमान करणे, अशी अपमानास्पद वक्तव्ये त्याने वारंवार केली आहेत. सरकारची खिल्ली उडवण्यासाठी जी घटना घडली, त्याचं त्याला गांभीर्य नसावं, मला तर शंका आहे की त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असावं.” अशी प्रतिक्रीया राज्याचे ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या 45 मिनिटांच्या शोमधील काही भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक गाण्याच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित स्टुडिओमध्ये तोडफोड केली. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर, आता आणखी एक गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. खरंतर हा व्हिडिओ नवा नसून काही वर्षांपूर्वीचा आहे. तरीही सध्या एकनाथ शिंदेंवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादामुळे कामराचे हे जुने व्हिडिओ देखील पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत.
एप्रिल महिन्यात फिरण्यासाठी हे ५ ठिकाण आहेत चांगले, सुंदर दृश्य बघून मन होईल आनंदी
कुणाल कामराच्या या व्हिडीओवर बोलताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, “स्वत:ला कायद्याच्या वर समजणं, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करून मला काहीच होऊ शकत नाही, असा समज बाळगणं. खासदार संजय राऊत काल जे म्हणाले, दोघांचाही डीएनए सेम आहे. त्यावरून हा पुरावा दिसत आहे. त्यानुसार, त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. कुणाल कामराला समन्स बजावलं आहे. चौकशीसाठी बोलवलं आहे. तो हजर होईल, त्यामुळे त्याने समोर यावं आणि त्याने पोलिसांना सांगावं.’
तो आरोपी असला तरी त्याला नोटीसीनुसार, त्याला संरक्षण दिलं जाईल, त्याचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्या क्लबमध्ये जी तोडफोड झाली त्याचं समर्थन कऱण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेतला पाहिजे. पण जर आमच्या नेत्यांवर अशा पद्धतीने कोणी टिका करत असेलतर शिवसैनिक ते ऐकून घेणार नाहीत. दोष शिवसैनिकांना देऊन उपयोग नाही. तोडफोडीनंतर त्या शिवसैनिकांवरही गुन्हे दाखल झाले. आमच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आम्ही महत्त्व देतो, असही योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं म्हटलं होतं. खार येथील एका क्लबमध्ये कुणाल कामराने ठाणे की रिक्षा असं विडंबनात्मक गाणं गाऊन एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. हे गाणं समोर आल्यानंतर संतप्त शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जिथे कुणाल कामराने शो केला होता त्या क्लबची तोडफोड केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यावरुन राज्यभरात कुणाल कामराविरोधात आंदोलन करण्यात आलं. कुणाल कामरावर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबची तोडफोड देखील केली.
उन्हाळ्यात नियमित करा वाटीभर दह्याचे सेवन, शरीरासह आरोग्याला होतील अद्भुत फायदे
या प्रकरणात कुणाल कामराला पोलिसांनी Whats App द्वारे समन्स बजावलं होते. कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्याने हजर राहावे, यासाठी त्याला समन्स पाठवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतरही त्याचं आणखी एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. “‘हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. ‘हम होंगे कंगाल एक दिन” अस तो गाताना दिसत आहे.