मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) 39 आमदारांनी (MLA) बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर राज्यात संत्तार झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) विराजमान झाले. यानंतर शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक तसेच खासदारांनी (corportor and mp) सुद्धा शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरु केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा महाराष्ट्र दौरा व उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) बैठका यामुळं शिवसैनिकांना धीर आला असून, शिवसेनेला गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. या धरतीवर शिवसेनेची मोट बांधण्यासाठी आज शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. (List of Shiv Sena spokespersons announced)
[read_also content=”कल्याण-डोंबिवलीतील लहान मुलींवरील अत्याचार विरोधात राष्ट्रवादी तीव्र आंदोलन छेडणार – विद्याताई चव्हाण https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-vidya-chavan-press-conference-about-women-crime-327818.html”]
दरम्यान, शिवसेनेच्या १९ प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ७ महिला नेत्यांचाही समावेश आहे. संजय राऊत यांच्याशिवाय खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही नावे प्रवक्त्यांच्या यादीत आहेत. विशेष म्हणजे या यादीमध्ये सध्या ईडीने अटक केलेले खासदार संजय राऊत यांचेही नाव असून मोबाईल नंबरसुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोण आहेत शिवसेनेचे प्रवक्तेे
खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, संजना घाडी, आमदार अनिल परब, आमदार सुनिल प्रभु, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मनिषा कायंदे, शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, आनंद दुबे, किशोर तिवारी, चिंतामणी कारखानीस, सुषमा अंधारे, हर्षल प्रधान