Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभू श्री राम यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे धर्मांतर करावे, राणेंचा खरपूस समाचार

आमदार नितेश राणे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, सातत्याने देवतांच्या होणाऱ्या अपमानाचा सकल हिंदू समाजाने विचार करावा असेही त्यांनी सांगितले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 04, 2024 | 04:50 PM
प्रभू श्री राम यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे धर्मांतर करावे, राणेंचा खरपूस समाचार
Follow Us
Follow Us:

कणकवली : आपल्या देशात हिंदू देवतेचे अपमान करण्याची स्पर्धा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षा मध्ये सुरू आहे. प्रभू श्री राम यांनी १४ वर्षे कंदमुळे खाऊन वनवासात राहिले असे पुरावे आहेत. मात्र मांसाहार केला अशी मुंब्राच्या जितू उद्देन म्हणजेच आमदार जितेंद्र आव्हाडने गरळ ओकली आहे. प्रत्येक वेळी हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माचा अपमान केला जातो याचा सकल हिंदू समाजाने विचार करण्याची गरज आहे. असे आवाहन करतानाच आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपुर समाचार घेतला. आमदार आव्हाड याने प्रभू श्री राम यांच्याबद्दलच्या वक्तव्याचे पुरावे द्यावेत. जर पुरावा नसेल तर धर्मांतर करावे आणि मुंब्रा येथे जितुद्दीन म्हणून राहावे अशी जळजळीत टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

जी हिम्मत प्रभू श्री राम यांच्या बाबत करतात तीच हिम्मत इतर धर्माचा आणि त्यांच्या देवतांचा अपमान केला असता तर जिवंत ठेवले असते काय? असा सवाल करत सगळे प्रयोग आणि हिम्मत फक्त हिंदू देवता आणि धर्मा बद्दल दाखविली जाते. चमकूगिरी करायची असेल तर खरच जितू उद्देन (जितेंद्र आव्हाड) मध्ये हिंमत असेल तर जाहीर सभेत बोलावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. आमच्या मित्र रोहित पवारला लवकर अक्कल आली. म्हणून त्याने आव्हाड ना रोखले मात्र तुम्ही खर हिंदू असाल तर जितेंद्र आव्हाडची पक्षातून हकालपट्टी करून दाखवावी असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.

संजय राऊत यांना महानंदा जागे बाबत चिंता आहे की? रेस्ट हाऊस मध्ये तुला रशियन चित्रपट बघायला आवडतात त्या चित्रपटांची चिंता आहे? त्या ठिकाणी ३५० कोकणातील कामगार आहेत त्यामुळे आम्हाला महानंदा डेअरीची काळजी आहे. ती आम्ही व्यवस्थित चालविण्यात आहोत. आमचं महायुतीच सरकार तुमच्या सारखा लुटारू नाही. योग्य तो निर्णय आमचे सरकार घेईन भांग पिऊन किती ही बडबडला तरी आम्ही तुम्हाला विचारत नाही. अंगणवाडी सेविकाचा प्रश्न महाविकास आघाडी पासून आहे. स्वतःच्या मेहुण्यांची काळजी होती तेवढी अंगणवाडी सेविकांची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर अंगणवाडी सेविकांचा प्रश्न ते मुख्यमंत्री असताना सुटला असता मात्र आम्ही महायुती सरकार म्हणून अंगणवाडी सेविकांना निश्चितच न्याय मिळवून देणार असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Web Title: Lord shri ram jitendra awad nitesh rane maharashtra political party maharashtra government politics update sindhudurg thane ncp bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • BJP
  • Lord Shri Ram
  • Maharashtra Government
  • Nationalist Congress Party
  • Nitesh Rane
  • thane

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
1

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार
2

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
3

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
4

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.