Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो सावधान ! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 3 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा, पाऊस झाला नाही तर फक्त ‘इतकेच’ दिवस मिळणार पाणी

मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलाव आणि धरणांत केवळ 55 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्या 3 वर्षांतील हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं हवामान विभागानं यंदा मान्सून मुंबईत उशिरा सक्रिय होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2023 | 12:44 PM
मुंबईकरांनो सावधान ! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 3 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा, पाऊस झाला नाही तर फक्त ‘इतकेच’ दिवस मिळणार पाणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलाव आणि धरणांत केवळ 55 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्या 3 वर्षांतील हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं हवामान विभागानं यंदा मान्सून मुंबईत उशिरा सक्रिय होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या (BMC) चिंतेत भर पडलेली आहे. सध्या मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट तूर्तास नसलं, तरी जूनमध्ये तलाव आणि धरण क्षेत्रांत पाऊस झाला नाही तर मात्र पाणीकपातीला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानंच ही माहिती दिलीय.

सध्या प्रत्येक दिवशी सात तलाव आणि धरणक्षेत्रातील पाण्याचा आढावा घेण्यात येतोय. मुंबईला दररोज 3850 एमएलडी पाणी पुरवण्यात येतं. सध्या धरणक्षेत्रांत 212433 एमएलडी पाणी शिल्लक आहे. सध्या 55 दिवसांचा पाणीसाठी आहे, यातील 10 टक्के पाणी हे राखीव ठेवण्यात येतं.

गेल्या 3 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

सध्याच्या स्थितीत शनिवारपर्यंत एकूण क्षमतेच्या केवळ14 टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 19 टक्के होता. तर 2021 साली हा आकडा 15 टक्के होता.

राखीव पाणी वापरण्यासही सरकारची परवानगी

धरणक्षेत्रांतील पाणीसाठा घटत असल्यानं राखीव पाणी वापरण्याची परवानगी महापालिकेनं सरकारकडं मागितली होती. हे पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आरक्षित जलसाठ्यातून प्रतिदिन 150 एमएलडी पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

Web Title: Lowest water storage in 3 years in water supply dams in coming possibilities of water supply nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2023 | 12:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Water
  • Water supply

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
4

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.