जनसुरक्षा कायद्यामुळे नागरिक, संघटना आणि आघाड्यांचे लोकशाही अधिकारावर गदा येऊ शकते. त्यामुळे जनसुरक्षा विधेयकास तीव्र विरोध असल्याचे सर्वहारा जन आंदोलन, रायगड व भारत जोडो अभियान महाराष्ट्र यांनी म्हटले आहे. या संघटनांतर्फे गुरुवारी (18 जुलै) अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, शिवसेनेचे नेते सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते.
कायद्या आणण्यामागचा उद्देश
जनसुरक्षा विधेयकाच्या उद्देशामधे राज्यातील दुर्गम व शहरी भागात नक्षलवादाचा प्रभाव वाढत असून शहरात त्यांची सुरक्षित आश्रयस्थळे व शहरी अड्डे वाढत असल्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर कायद्याची गरज असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांची भूमिका
सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी या कायद्याचा विरोध करताना म्हटले की, नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनात 11 जुलै रोजी आणण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाबाबत आमची भूमिका मांडण्यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले आहे. या जनसुरक्षा विधेयकास आमचा पूर्ण विरोध आहे. सरकारला जे जाब विचारतात. सरकारच्या धोरणांची पोलखोल करणाऱ्यांविरोधात, मानवाधिकारांचा भंग करणारा, संविधानिक मूल्यांचा पायमल्ली करणारा आणि लोकशाहीतील विरोधी आवाज दडपण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाईल.
निवेदनातील महत्वाचे मुद्दे






