करूणा मुंडेने धनंजय मुंडेंची केली कोंडी (फोटो सौजन्य-X)
परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर करुन खळबळ उडवून दिली. मतदानाच्या एक दिवस आधी करुणा यांनी इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करत धनजय मुंडेंना पाडण्याचं आवाहन परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना केलं होतं. त्याचप्रमाणे काही तरुणींची नावं घेत करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केले आहे.
नमस्कार, मी करुणा धनंजय मुंडे, परळीच्या जनतेल माझा हात जोडून विनंती आहे की धनंजय मुंडे यांना पाडा, एक मतदान करु नका, कारण धनंजय मुंडे इतका सत्तेचा गैरवापर कुणीच केला नाही. स्वतःच्या बायकोला तीन तीन वेळा जेलमध्ये टाकणं, गुंडांकरवी मारहाण करुन घेणं, तीन वेळा तुरुंगात टाकले, गुंडासारखे मारहाण केली,पत्नीला पोलिसांच्या हातून मारहाण करणं.. तुमचं काय भलं करेल तो? असे प्रश्न करुणा शर्मा यांनी उपस्थित केले.
मुंबईत दिवसभर पोलीस उभे राहिले आणि मी वैतागून जायचे. माझा मुलगा… माझा मुलाचे अश्रुही परळीत सांडले आहेत. असं म्हणताना करुणा शर्मा यांचा कंठ दाटून आला. मुलांनी आपल्या आईला तुरुंगात जाताना पाहिलं आहे, असं पुढे त्या म्हणाल्या.
म्हणूनच मी हात जोडून विनंती करते की,त्याला मतदान करू नका. जो मेहुणीवर बलात्कार करतो. तुमच्या पैशांनी, जनतेच्या पैशांनी काय करतो.. फक्त प्राजक्ता माळीसारख्या मुलींचा.. स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी यासारख्या मुलींचं घर भरतं, ओबेरॉय हॉटेल पूर्ण बुक असतं, या लोकांच्या अय्याशीसाठी, असा घणाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.
हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की अशा लोकांना मतदान देऊ नका. अपक्ष उमेदवारही उभे असतील, चांगले लोकही उभे असतील. का तुम्हाला तोच-तोच नेता हवाय? किती गैरवापर करतात. तुमचा हजारो कोटी रुपयांचा निधी खाऊन टाकतात, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत. मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून ते बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेचे आमदार आहेत. मुंडे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केली परंतु हळूहळू त्यांचे मार्ग वेगळे झाले आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले.
2014 ते 2019 या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये 2020 ते 2022 पर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी उद्धव सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपद भूषवले. सध्या मुंडे हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या कोट्यातून कृषीमंत्री आहेत. ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.






