Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाना पटोलेंचा भाजपला इशारा; म्हणाले, आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर…

भाजपा खासदार संबित पात्रा यांनी राहूल गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा तीव्र निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2024 | 04:56 PM
नाना पटोलेंचा भाजपला इशारा; म्हणाले, आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर...

नाना पटोलेंचा भाजपला इशारा; म्हणाले, आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर...

Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी यांना देशद्रोही व गद्दार म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही आहेत असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपा खासदार संबित पात्राच्या विधानाचा तीव्र निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. देश ब्रिटिशांशी लढत होता तेव्हा संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वज ब्रिटीशांची साथ देत होते हा इतिहास आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगला, पंडित जवाहलाल नेहरु यांनी ११ वर्षे तुरुंगवास भोगला, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले, त्यावेळी भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून देश तोडण्याचे पाप करत होता. अशा विभाजनकारी विचारसरणीचे लोकच देशाचे खरे गद्दार व देशद्रोही आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांची छापेमारी; कपड्यांसह ३५ लाखांच्या वस्तू जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण नसताना पाकिस्तानात ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणून गेले व नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. मोदी सरकारनेच पाकिस्तानच्या आयएसआय ला भारतात पायघड्या घातल्या ते देशद्रोही कृत्त नाही का? भारताविरोधात घातपाती कारवाया करणाऱ्या दहशवाद्याला भाजपाच्या वाजपेयी सरकारने कंधारला सुरक्षित सोडून दिले त्याला देशद्रोही म्हणायचे नाही तर काय? याची उत्तरे भाजपा व संबित पात्राने द्यावीत. संबित पात्रा याची राहुल गांधींवर बोलण्याची पात्रता नाही पण ‘अदानी- मोदी भाई भाई’ असल्यामुळे मालकाच्या इज्जतीखातर पात्रा बोलून गेला पण त्याला भाजपाचा खरा इतिहास माहित नसावा, असेही नाना पटोले यांनी म्हटले. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही पटोलेंनी यांनी दिला.

Web Title: Maharashtra congress president nana patole has criticized the bjp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 04:56 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Nana patole
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.