New Delhi : सी.पी. राधाकृष्णन यांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदीय बोर्डाच्या बैठकीत सर्व सहमतीनं हा निर्णय घेतला गेला.
भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. पण दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पण राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन भाजपने राजकीय समीकरणेही साधण्याचा प्रयत्न केला आहे, भाजपाला दक्षिणेतील राज्यांमध्ये विशेषत: तामिळनाडूमध्ये ताकद वाढवायची असल्याने त्यांनी राधाकृष्णन यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर केले असावे. त्यामुळे सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देणं म्हणजे दक्षिणेतील नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेला बक्षीस देणे आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तर-दक्षिण या दरीला कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर
युती घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा- भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून द्रविड मुन्नेत्र कळगम बाहेर पडली. पण त्यानंतर राधाकृष्णन यांनी तामिळनाडू युनिटमध्ये युतीची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजप आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमसोबत पुन्हा युती झाली. या युतीसाठी राधाकृष्णन यांच्या नेतृत्त्वात मोठ्या वाटाघाटीही झाल्या. राधाकृष्णन यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कोइम्बतूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. द्रविड मुन्नेत्र कळगम आणि आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही स्थानिक पक्षांचा पाठिंबा नसतानाही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.
भाजपने फेब्रुवारी 2023मध्ये त्यांना झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिली. फेब्रुवारी 2023-जुलै 2024 या काळात ते झारखंडच्या राज्यपालपदी राहिले. याशिवाय, त्यांनी तेलंगणासह पुद्दुचेरी इथेही अतिरिक्त कार्यभार म्हणून त्यांनी राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली. गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये भाजपने त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिली. सी.पी. राधाकृष्णन यांनी याशिवाय संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ मध्ये ते तैवानला भेट देणाऱ्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचा भाग होते.
Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता! आज सकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात,
ते ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. तसेच, त्यांनी तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये अतिरिक्त कार्यभार सांभाळला. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांत त्यांनी झारखंडच्या सर्व २४ जिल्ह्यांना भेटी दिल्या होत्या तसेच नागरिक आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
सी.पी. राधाकृष्णन १९९८ आणि १९९९ मध्ये कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. खासदार असताना त्यांनी कापड उद्योगावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवरील संसदीय समिती (PSUs) आणि वित्त सल्लागार समितीचे सदस्य देखील राहिले आहेत. याशिवाय, ते स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे सदस्य देखील राहिले आहेत.
सी.पी. राधाकृष्णन हे २००३ ते २००६ दरम्यान तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. याशिवाय ते केरळ भाजपचे प्रभारी देखील होते. २००४ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून भाषण दिले आणि तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले.
२००४ ते २००७ दरम्यान तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नद्या जोडणे, दहशतवादाचा विरोध आणि अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या मुद्द्यांवर ९३ दिवसांची रथयात्रा काढली. तसेच ते संसदेत वस्त्रोद्योगावरील स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि वित्त व सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित अनेक समित्यांमध्ये योगदान दिले.