Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता! आज सकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत
१८ ऑगस्ट रोजी आज शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होणार आहे. प्रस्तावित जीएसटी सुधारणा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठक या सर्वांमुळे शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आठवड्याच्या शेवटी झालेल्या सकारात्मक घडामोडींमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.
गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९१५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २३० अंकांचा प्रीमियम होता. शुक्रवारपासून शेअर बाजारात कोणतेही व्यवहार झाले नाहीत. आज तीन दिवसांनंतर शेअर बाजाराची सुरुवात होणार आहे. ही सुरुवात सकारात्मक दिशेने होणार असल्याने गुंतवणूकदार आनंदी आहेत. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी, शुक्रवारी भारतीय शेअर बाजार व्यवहारासाठी बंद होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुरुवारी, भारतीय शेअर बाजार निर्देशांक किंचित वाढले, बेंचमार्क निफ्टी ५० २४,६०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५७.७५ अंकांनी म्हणजेच ०.०७% ने वाढून ८०,५ ९ ७.६६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ११.९५ अंकांनी म्हणजेच ०.०५% ने वाढून २४,६३१.३० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १६०.४० अंकांनी किंवा ०.२९% ने वाढून ५५,३४१.८५ वर बंद झाला.
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना HAL, UBL आणि युनायटेड स्पिरिट्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार व्होडाफोन आयडिया, केईसी इंटरनॅशनल, टोरेंट पॉवर, ग्लेनमार्क फार्मा, कोल इंडिया, जेके सिमेंट, आयनॉक्स विंड, आयआयएफएल फायनान्स, जीएमआर विमानतळ, इझमायट्रिप, वेदांत या स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात.
आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे उपउपाध्यक्ष मेहुल कोठारी, एसएस वेल्थच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर, एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, मदरसन सुमी वायरिंग इंडिया आणि लॉयड्स इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांनातीन तीन इंट्राडे स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये यूएनओ मिंडा, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी , स्टरलाइट टेक्नॉलॉजीज , टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अपटस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया आणि कमर्शियल सिन बॅग्ज यांचा समावेश आहे.