Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा’; श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश

Shrikant Shinde Meeting With Shivsena Party Workers In Jalgaon: राज्यात तब्बल २४ वर्षांनी मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे आणि या मोहीमेत बोगस मतदारांची नावे वगळली जाण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘बीएलए’ आणि समन्वयकांना पुढील तीन महिने डोळ्यांत तेल घालून काम करण्याचे निर्देश दिले आह

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 08:34 PM
‘मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा’; श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश
Follow Us
Follow Us:
  • २४ वर्षांनी मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण होणार
  • डोळ्यांत तेल घालून काम करा
  • श्रीकांत शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
राज्यात तब्बल २४ वर्षांनी मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे. या मोहीमेत बोगस मतदारांची नावे वगळली केली पाहिजेत. आपल्या मतदारांची नावे यादी आहेत की नाहीत, याची दक्षता पक्षाच्या ‘बीएलए’ने घेतली पाहिजे. पुढील तीन महिने ‘बीएलए’ आणि समन्वयकांनी डोळ्यांत तेल घालून काम करावे, असे निर्देश शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चाळीसगाव आणि अमळनेर येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने खान्देशात आलेल्या खासदार डॉ. शिंदे यांनी आज दिवसभर जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांच्या आढावा बैठका घेतल्या. या बैठकांना खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव संपर्क प्रमुख आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते, आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकात सोनावणे, आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, राज्य संघटन प्रमुख माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार शिरिष चौधरी, माजी खासदार उन्मेष पाटील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘सरकार मनोज जरांगे समोर लाचार, झुंडशाहीला बळी पडले,’ लक्ष्मण हाकेचा राज्य सरकारवर निशाणा

सकाळी चाळीसगाव येथे पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव विधानसभा मतदार संघांची आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मतदार याद्या २०२२ मध्ये तयार झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी राज्यात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण होणार आहे. ३० जूनपासून घरोघरी जाऊन मतदार यादी पुनर्निरीक्षण केले जाईल. त्यामुळे ‘बीएलओ’च्या कामावर ‘बीएलए’ आणि समन्वयकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पुढील तीन महिने ‘एसआयआर’ मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून सर्वांनी काम करावे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. पक्षात जो काम करतो त्यालाच शिंदे साहेब पद देतात. यामुळे एक सर्वसामान्य घरातील महिला ज्योतीताई वाघमारे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याचे काम शिंदे साहेबांनी केलं. शेतकरी चळवळीतील नेते बच्चू कडू यांना हेरून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे काम शिंदे साहेबांनी केले. आताही विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. यापुढे शिफारशींवर नेमणुका होणार नाहीत तर कामाच्या आधारेच संघटनेत पदं दिली जातील, असे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

एकजुटीने काम करा…

खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, चाळीसगावमध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालून इथली दादागिरी मोडून काढली पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बळ देऊन पाचोरा आणि एरंडोलप्रमाणे इथंही पक्ष मजबूत करा. आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी एकजुटीने काम करा, चाळीसगावमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात, घरात आणि प्रत्येक तालुक्यात शिवसेना वाढली पाहिजे. उन्मेष पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने चाळीसगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे ते म्हणाले.

दुपारी अमळनेर येथे चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या विधान सभा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, बीएलए १ आणि बीएलए २ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समन्वयक नियुक्त करावा. तो समन्वय ‘बीएलए’च्या बैठका घेईल आणि दैनंदिन कामाचा आढावा घेईल. आपल्या मतदारांची नावे वगळली तर पुढे त्याचा पाठपुरावा करावा लागेल. जळगावातील मतदार संघांवरील शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले पाहिजे, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुका युतीचा तालुका होता. जळगाव जिल्ह्यात हिंदुत्वावादी मतांचा पगडा आहे आणि तो कायम राहिला आहे, असे मंत्री पाटील आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या घोषणेमुळेच आज राज्यात दोन लाख रुपयांची कर्ज माफी केली. ‘एनडीआरएफ’चे निकष शिथिल करण्याचे काम शिंदे सरकारने केले. स्वयंरोजगार, रोजगार, पोलीस पाटील, कोतवाल, आशा, अंगणवाडी सेविका, लाडकी बहिण यांच्याबाबत घेतलेले निर्णय आणि योजनांमुळे राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले, असे मंत्री पाटील म्हणाले. तत्पूर्वी खासदार डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी रात्री धुळे जिल्ह्यातील साक्री, सिंधखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण, धुळे शहर या विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

दोन दिवसांत खान्देशातील १९ विधानसभांचा घेतला आढावा

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोन दिवसाच्या शिवसंवाद दौऱ्यात खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे जिल्हे पिंजून काढले. या तीन जिल्ह्यातील १९ विधानसभा मतदार संघाचा खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला. पहिल्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे अक्कलकुवा, शहादा, नंदुबार येथे नवापूर व नंदुरबार, धुळ्यामध्ये साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण, धुळे शहर या मतदार संघांचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी चाळीसगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव, अमळनेर येथे चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर मतदार संघांचा आणि मुक्ताईनगर येथे रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर विधानसभांची आढावा बैठक घेतली. नुकताच खासदार डॉ. शिंदे यांनी मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा दौरा केला होता.

‘कोक्रोच ना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ उद्धव ठाकरेंचा कॉक्रोचेसना पाठिंबा

Web Title: Maharashtra voter list revision 24 years shrikant shinde bls instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • Jalgaon News
  • shivsena

संबंधित बातम्या

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
1

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
2

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी
3

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना
4

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.