Photo Credit- Team Navrashtra
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला 230 जागांवर दणदणीत यश मिळाले. पण महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं. अनेक संस्थांनी गेल्या निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणांमधून अटीतटीची लढाई होणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. पण यंदाच्या विधानसभा निकालाने महाविकास आघाडीलाच धक्काच नव्हे तर महाविकास आघाडीत भूकंपच घडवून आणला. त्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडून निकालावर आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप घेण्यास सुरूवात झली. अनेक उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील इव्हीएम मशीन आणि मतमोजणी केंद्रावरही गडबड झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर फिरू लागले. या सर्व घडामोडींनंतर राज्यातील विरोधी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ईव्हीएम विरोधात नव्या जनजागृतीची हाक दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी पायी ‘भारत जोडो’ काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून देशभरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. यानंतर आता राज्यासह काँग्रेसकडून ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या यात्रेची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत इव्हीएम संदर्भातही बैठक झाली. यात शिवसेनेच्याही अनेक उमेदवारांनी इव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप नोंदवले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्च करून भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.
सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभेत; बल्लारपूरमधून सलग चौथ्यांदा ठरले विजयी
निकालानंतर विरोधी महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ईव्हीएम विरोधात लढा उभा करायचा. आता मागे हटायचं नाही, कायदेशीरच नव्हे तर रस्त्यावरचीही लढाई लढायची. त्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.
ठाकरे गटाचे नेते राजन विचारे म्हणाले की, निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात आठ- पंधरा दिवस आधीपासून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे दिसत होते. लोकांचाही प्रतिसाद दिसत होता. कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. काही ठिकाणी 99 टक्के बॅटरी असलेल्या मशीन आढळून आल्या. इव्हीएम विरोधात राज्यभरातून निवडणूक आयोगाकडे एवढया तक्रारी जाऊनही आयोगाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी मतदारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी दिल्या होत्या. असंच चालू राहिलं तर एक दिवस देशातील लोकशाही संपून जाईल, त्यामुळे ता रसत्यावरचा लढा लढावाच लागेल. आता जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय़ होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा एल्गार राजन विचारे यांनी यावेळी केला.
Maharashtra’s power struggle: महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेला का होतोय उशीर?