महायुतीच्या ७३ तर महाविकास आघाडीच्या ४१ जागांवर अद्याप उमेदवारच जाहीर करण्यात आलेले नाहीत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काउंटडाउन सुरू झालं आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे, तर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. मात्र सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. जागा वाटपाचा मुद्दा इतका गुंतागुंतीचा आहे की हे सोडवण्यासाठी महायुतीच्या बैठकांचं सत्र महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. नुकतीच महायुतीतील नेत्यांची बैठक गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली.
शिवसेना (ठाकरे गट)- 84 जागा
काँग्रेस- 87 जागा
एनसीपी (शरद पवार गट)- 76 जागा
एकूण- 247
शिल्लक जागा- 41
बीजेपी- 121
शिवसेना- 45
एनसीपी- 49
एकूण- 215
शिल्लक- 73
हे देखील वाचा-Maharashtra Election : RPI ला अद्याप एकही जागा नाही, ‘दादां’कडून १० जागांची मागणी; थेट दिल्लीतून आला हा हुकूम
उद्धव ठाकरे गटाने आतापर्यंत 3 यादी जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 65, दुसऱ्या यादीत 15 आणि तिसऱ्या यादीत 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसनेही 3 यादी जाहीर केल्या आहेत, पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवार जाहीर केले आहेत. शरद गटानेही 3 यादी जाहीर केल्या आहेत, पहिल्या यादीत 45, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्या यादीत 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तरीही 41 जागांवर पेच आहे.
हे देखील वाचा-Muslim Politics: निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लीमांना कमी तिकीटे? काँग्रेस नेत्याने दिले उत्तर
दुसरीकडे, महायुतीमध्ये बीजेपीने एकूण 121 उमेदवार जाहीर केले आहेत. पार्टीने यासाठी 2 यादी जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 99 आणि दुसऱ्या यादीत 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेने फक्त एकच यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 45 प्रत्याशीयांची नावे आहेत. अजित गटाच्या एनसीपीने एकूण 49 उमेदवार जाहीर केले आहेत, पार्टीने पहिल्या यादीत 38, दुसऱ्या यादीत 7 आणि तिसऱ्या यादीत 4 नावांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही 73 जागा आहेत, ज्यांवर उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडे केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी खलबते सुरू आहेत. दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र बसून जागावाटपाच तिढा सोडावावा, असा आदेश भाजप हायकमांडने दिला आहे. त्यानंतर वर्षा बंगल्यावर महायुतीची मोठी बैठक होत असून आजच उर्वरित जागा जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने जवळपास ५० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र अजून १० जागांसाठी आग्रही आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान जागावाटपाच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले असून बैठकीलाही सुरुवात झाली आहे. आहेत.