Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; ‘इतक्या’ जागांसाठी भाजपने सुरू केली तयारी

2019 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 पैकी अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 24, 2024 | 11:33 AM
सौजन्य- सोशल मीडिया

सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावटपावरून चढाओढ सुरू असल्याच्या  चर्चा होत्या. यात शिंदे गटाने १०० तर अजित पवार यांच्या गटाने ९० जागांवर दावा केला होता. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाने  जागावाटपांबाबत केलेल्या मागण्यांमुळे महायुतीतीत धुसफूस सुरू होती. पण या भाजप किती जागांवर लढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

पण काही सुत्रांच्या हवाल्याने,  महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. तर भाजपकडून शिंदेसेनेला 60 ते 65 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रामदास आठवले यांनी त्यांच्या रिंपाईसाठी 10 जागांची मागणी केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही विधानसभेसाठी जवळपास 20 जागा मिळू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष जागावाटपाच्यावेळी रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, 2019 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 पैकी अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. तर  सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही विजय मिळवत काँग्रेसला पाठिंबा दिला.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. पण यंदा मात्र भाजपला 9 उमेदवार विजयी झाले. लोकसभेच्या या निकालानंतर आता भाजपने विधासभा निवडणुकीसाठी भाजप सावध पावले टाकताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत विजयानंतर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चाही झाली होती.

दरम्यानस काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.  तर ठाकरे गटाला 90 ते 95 जागा आणि शरद पवार यांचा गट 80 ते 85 जागांवर लढू शकतो, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.  महाविकास आघाडीने आता तीनही गटांना प्रत्येकी 96-96-96  जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे.

 

Web Title: Mahayutis seat sharing formula bjp started preparations for so many seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • Nationalist Congress Party
  • raj thackeray
  • shivsena
  • Vidhansabha Elelction 2024

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
3

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.