कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चाना राजकीय पक्षांमध्ये सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले असून या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याणमध्ये महिला काँग्रेस देखील सक्रिय झालेली दिसत आहे. महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि कल्याण डोंबिवलीच्या प्रभारी नीता त्रिवेदी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली.
हेदेखील वाचा – कल्याण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य, मात्र खड्डे बुजविण्याची मशीन धूळखात
या बैठकीमध्ये कल्याण डोंबिवली महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कल्याण पश्चिम विधानसभेत महिला काँग्रेसचा उमेदवार देण्यात यावा असा ठराव मंजूर करून त्यांची एक प्रत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या प्रभारी निता त्रिवेदी यांना देण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हा प्रभारी नीता त्रिवेदी आणि महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या हस्ते समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या काही महिलांचा पक्ष प्रवेश घेऊन त्यांची पद नियुक्ती करण्यात आली.
हेदेखील वाचा – मोठी बातमी! मराठा ठोक मोर्चाचा इशारा; शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ
यावेळी कल्याण ए ब्लॉक अध्यक्ष शबाना शेख, कल्याण बी ब्लॉक अध्यक्ष माया डोळस, मोहोने टिटवाळा ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर, डोंबिवली ब्लॉक अध्यक्ष पौर्णिमा राणे, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष वर्षा रसाळ, माया खरात, सत्यभामा जयस्वाल, सोलेहा शेख, दर्शना पानपाटील, राबिया शेख, मेहनाझ शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.