Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिमंडणगडावर ‘शिवमुद्रा’ची दुर्गसंवर्धन मोहीम; भैरी भवानीला जलाभिषेक, गडवाटा सुरक्षित करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

Shivmudra Trekkers Trekking on Mahimandangad Fort : कराडच्या ‘शिवमुद्रा ट्रेकर्स’च्या दुर्गमित्रांनी ऐतिहासिक किल्ले महिमंडणगडाची मोहीम यशस्वीपणे पूर्ण करत गडदेवता भैरी भवानी मंदिराची स्वच्छता केली आणि देवीला जलाभिषेक केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 08:57 PM
महिमंडणगडावर ‘शिवमुद्रा’ची दुर्गसंवर्धन मोहीम; भैरी भवानीला जलाभिषेक, गडवाटा सुरक्षित करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा निर्धार
Follow Us
Follow Us:
  • महिमंडणगडावर ‘शिवमुद्रा’ची दुर्गसंवर्धन मोहीम
  • भैरी भवानीला जलाभिषेक
  • गडवाटा सुरक्षित करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा निर्धार
कराड: सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या किल्ले महिमंडणगडाची मोहीम ‘शिवमुद्रा ट्रेकर्स, कराड’च्या दुर्गमित्रांनी यशस्वीपणे पूर्ण केली. गडावर पोहोचल्यानंतर गडदेवता भैरी भवानी मंदिराची स्वच्छता करून गडावरील पाण्याने देवीला जलाभिषेक करण्यात आला. गडकिल्ले आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या ग्रुपच्या उद्देशाचे कौतुक होत आहे.

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा

सातारा-रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील ऐतिहासिक रघुवीर घाटावर नजर ठेवणारा महिमंडणगड हा महत्त्वाचा वनदुर्ग आहे. घनदाट जंगल, खोल दऱ्या, उंच डोंगररांगा आणि गडावरील ऐतिहासिक अवशेषांमुळे हा परिसर दुर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील मेटसिंदी गावातून गडाकडे जाणारी पायवाट घनदाट जंगलातून जाते. महिमंडणगड समुद्रसपाटीपासून सुमारे ३०७० फूट उंचीवर आहे. गडमाथा दोन टेकड्यांमध्ये विभागलेला आहे. गडावर भैरी भवानीचे मंदिर असून, दगडात खोदलेल्या सुमारे १० ते १२ पाण्याच्या टाक्या आढळतात. दोन बुरुजांच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.

गडावर पोहोचल्यानंतर ग्रुपच्या दुर्गमित्रांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर जलाभिषेक, फुलांची सजावट, नैवेद्य व आरती करण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, जय भवानी…जय शिवाजी’ आदी जयघोषांनी गडमाथा दुमदुमून गेला.

दरम्यान, मोहिमेदरम्यान गडावर जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक खुणा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रथमच येणारे शिवप्रेमी व ट्रेकर्स घनदाट जंगलात भरकटण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आगामी काळात आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, भगवे झेंडे व रेबीन लावणे, तसेच चुन्याने मार्गाचे मार्किंग करण्याचे काम हाती घेण्याचा निर्धार ‘शिवमुद्रा ट्रेकर्स’ने केला. दुर्गभ्रमंती ही केवळ पर्यटन न राहता इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ बनावी, असा या संदेश मोहिमेतून देण्यात आला. गडावर प्लास्टिक व कचरा न टाकणे, पाणीसाठे स्वच्छ ठेवणे आणि ऐतिहासिक अवशेषांना हानी न पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले.

या मोहिमेत दुर्गमित्र समीर अराणके, राजेंद्र मोहिते, सौरभ कुंभार, गुरुनाथ साने, जयवंत मोहिते, प्रसाद ढवळीकर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ग्रुपचा सदस्य असलेला रुसी नावाचा श्वानही या मोहिमेत सहभागी झाला होता. संपूर्ण गडवाटेवर प्रत्येकावर लक्षात ठेवणाऱ्या या सहकाऱ्याच्या सहभागामुळे मोहिमेतील उत्साह आणखीच दुणावला होता. महिमंडणगडाच्या भ्रमंतीतून ऐतिहासिक व नैसर्गिक अशा दोन्हींचा अद्भुत मिलाप पहायला मिळतो. दुर्गभ्रमणावेळी इतिहासाची अनुभूती घेत गड आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न ‘शिवमुद्रा ट्रेकर्स’ने केला.

  • रघुवीर घाटावर नजर ठेवणारा महत्त्वाचा वनदुर्ग
  • गडदेवता भैरी भवानीचे मंदिर
  • दगडात खोदलेल्या १० ते १२ पाण्याच्या टाक्यांचा समूह
  • दोन टेकड्यांमध्ये विभागलेला गडमाथा
  • बुरुज व भग्न प्रवेशद्वाराचे अवशेष
  • खोल दऱ्या आणि सह्याद्रीचे नयनरम्य दृश्य
  • उंच डोंगर माथ्यावरून कोसळणारे असंख्य जलप्रपात (धबधबे)

‘गड पाहू… निसर्ग जपू!’

गडावर कचरा न करणे, ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लावणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवणे आणि जंगलातील जैवविविधतेचे संरक्षण करणे, ही प्रत्येक दुर्गप्रेमीची जबाबदारी आहे. अशा छोट्या कृतींतूनच गडकिल्ल्यांचे वैभव पुढील पिढ्यांपर्यंत जपता येईल, यासाठी ‘गड पाहू… निसर्ग जपू!’ असा संदेशही यावेळी देण्यात आला.

ठाकरे कलादालनावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण; भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीने चर्चेला उधाण

Web Title: Mahimandangad fort shivmudra trekkers karad fort conservation campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • fort
  • Karad news

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
1

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.