जळगाव : भुसावळ विभागातील २२ पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल ३ कोटी ४२ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. या सर्व योजना भुसावळ व जामनेर तालुक्यातील आहेत. यामुळे त्यांच्यावर अवलंबून गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
दरम्यान मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकी वसुली अभियानाला गती दिली आहे. त्यात तब्बल ७२ गावांकडून १० लाख रुपयांपर्यंत थकबाकी वसूल करण्यात आली. दरम्यान, महावितरणच्या भुसावळ विभागातील भुसावळ व जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. ही रक्कम भरावी यासाठी वारंवार नोटीस देण्यात आली.
[read_also content=”ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल तीन महिन्यांत : विजय वडेट्टीवार https://www.navarashtra.com/maharashtra/report-of-the-committee-appointed-for-obc-reservation-in-three-months-vijay-vadettiwar-nrdm-259300.html”]
नोटीस दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने वांजोळा, मोंढाळे, विचवा, सुनसगाव, खडका, गोंभी, पळसखेडा, फत्तेपूर, वडगाव, वाघाडी आदींसह २२ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत केला. परिणामी ऐन उन्हाळ्यात या गावांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.